गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद गौतम बचुटे/केज केज जवळील महामार्गावरील टोल नाक्या जवळ गाडी अडवून गावठी कट्टयाचा धाक दाखवत बारा ते तेरा जणांनी पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडे दोन कोटी रु च्या खंडणीची मागणी केली असल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या बाबतची माहिती अशी की, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेले टागोर नगर नाशिक जिल्ह्यातील टागोर नगर येथील सुनिल केदु शिंदे (ह. मु. जालना रोड बीड) आणि त्यांचे सहकारी हे दि. २८ मे रोजी रात्री बीड कडून केजकडे येत असताना त्यांना रात्री सुमारे…
Author: विजयराज आरकडे
सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम बीड ! प्रतिनिधी बीड शहरातील सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आसून शाळेचा एकुण निकाल ९७.३६% टक्के लागला असून सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव रोहीणीताई राख यांनी अभिनंदन केले आहे. बीड शहरातील नगररोड येथील सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे.१) चि.मुंडे श्रीनाथ प्रकाश ८८.२०% (प्रथम) २) चि.गिरी रितेश संतोष ८८.००% (दुतिय) ३) चि.येळवे महारुद सुंदर ८०.००% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर शाळेचे एकुण ३९ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते.त्यापैकी १३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आसून प्रथम श्रेणीत १५ विद्यार्थी, तर द्वितीय श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्व यशस्वी…
केज तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करा *रिपाइं* केज :- अवकाळी.पाऊस आणि वादळ वाऱ्यात केज तालुक्यात अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झालेले आहे. त्याची दखल केज तालुका रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी घेवून विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी विज वितरण कंपनीकडे केली आहे. मागील आठवड्यात केज तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे केज तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त होवून वीज वाहक तारा तुटल्या तर विद्युत रोहित्र देखील खाली जमिनीवर पडून प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे तालुक्यातील काही गावांचा विद्युत पुरवठा हा मागील आठवड्यातून…
अहिल्यादेवींचे विचार सर्वांच्या मनावर रुजले पाहिजेत – ह भ प संभाजी महाराज धूळगंडे केज- गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती रथामध्ये घेऊन पायी दिंडी 31 मे पर्यंत चौंडी ला जात असते या वर्षी या दिंडीचे आगमन बुधवार रोजी दुपारी केज येथे झाले. केज शहरात नागरिकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन स्वागत केले .रथयात्रा दिंडीसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ह भ प संभाजी महाराज धुळगंडे,प्रा डॉ मुरहरी कुंभारगावे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ कुंभारगावे म्हणाले अहिल्यादेवी होळकरांचे विचार समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे मत व्यक्त केले. अहिल्यादेवीचे विचार सर्वांच्या…
शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम संभाजीनगर- जिद्द, चिकाटी, एकाग्रता असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. हेच छञपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या तनीषा बोरमणीकर हीने सिद्ध करून दाखविले आहे. तनिषा ही चेस खेळात अव्वल आहे. चेसच्या अनेक स्पर्धांमुळे तिला वर्षभर अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. तरी तिने शेवटच्या 2 महिन्यात चेस खेळासारखी एकाग्रता दाखवून 12 वी परीक्षेत 100% घेऊन राज्यात पहिली आली. ती कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी असून तिचे भविष्यात CA होण्याचे स्वप्न आहे. तनिषाने 10वी मध्ये देखील 98% घेतले होते.
श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम आडस/प्रतिनिधी:- बारावी बोर्डाच्या परिक्षा फेब्रुवारी 2024 च्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलीत श्री छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय आडस या महाविद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. या महाविद्यालयातून एच.एस.सी.बोर्डाच्या फेब्रु. 2024 च्या परिक्षेसाठी एकूण 202 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. महाविद्यालयाचा एकूण निकाल 95.47 % लागला आहे. सायन्स मध्ये एकूण निकाल – 98.75 % सर्वप्रथम कू. शिंदे योगिता योगेश 83.00 % द्वितीय क्रमांक चि. आकुसकर प्रणव विजयकुमार 80.67 % तर तृतीय क्रमांक कु.शिनगारे प्रीती सुजित – 79.67% यांनी मिळवला. आर्ट्स मध्ये एकूण निकाल 97.29% सर्वप्रथम…
बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला
बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ केज मतदारसंघात 70.31℅ मतदान केज- बीड लोकसभा निवडणूक मतदान काल दि. 13 मे रोजी संपन्न झाले आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारीत विक्रमी वाढ झाली आहे. भाजपा कडून पंकजाताई मुंडे, महाविआ कडून बजरंग बप्पा सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली आहे. ही लोकसभा निवडणुक अत्यंत चुरशीची झाली असून उमेदवार, कार्यकर्ते यांच्या एकमेकाविरुद्ध केलेले आरोप -प्रत्यारोप यांनी विशेष गाजली आहे. तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सभाही घेतल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मतमोजणीच्या नंतर निकाल…
केजरीवाल यांना जामीन मंजूर;गेजमध्ये तोफा वाजवून केले स्वागत केज- आज दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांना निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात का होत नाही सर्वोच्य न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला. देशाची राजधानी जिंकणारा हा नेता आम्हाला गरजेचा आहे. शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सत्तेचा उपयोग केला आहे. सर्वोच्य न्यायालयाचे स्वागत केज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोफा वाजवून केले.
केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२०० किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात केज- केज पोलीसांनी धाडसी कारवाई करत तब्बल १२०० शे. किलो चंदन जप्त केले आहे. ज्याची अंदाजे किंमत दोन कोटीच्या घरात आहे. डिवाएसपी कमलेश मिना, पोलीस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलीसांनी ही धाडसी कारवाई केली आहे. दोन आरोपी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केज पोलीस ठाण्यात भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत. मोठे रॅकेट पोलीसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.