सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम
बीड ! प्रतिनिधी
बीड शहरातील सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आसून शाळेचा एकुण निकाल ९७.३६% टक्के लागला असून सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव रोहीणीताई राख यांनी अभिनंदन केले आहे.
बीड शहरातील नगररोड येथील सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे.१) चि.मुंडे श्रीनाथ प्रकाश ८८.२०% (प्रथम) २) चि.गिरी रितेश संतोष ८८.००% (दुतिय) ३) चि.येळवे महारुद सुंदर ८०.००% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर शाळेचे एकुण ३९ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते.त्यापैकी १३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आसून प्रथम श्रेणीत १५ विद्यार्थी, तर द्वितीय श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्यध्यापिक श्रीमती मुंडे ए.एम.यांच्यासह शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.