संघर्ष पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी रोखठोक न्युज चे संपादक बाबासाहेब मस्के तर सचिव पदी रवींद्र मेटे यांची निवड.
केज प्रतिनिधी.
संघर्ष पत्रकार संघ केज यांची सालाबादा प्रमाणे आज बैठक होऊन अध्यक्ष,सचिव व इतर पदार्थ साठी आयोजित केले असता माजी तालुकाध्यक्ष श्रीराम तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव अनिल गंलाडे यांच्या सुचवलेल्या नावा प्रमाणे रोखठोक न्युज चे संपादक बाबासाहेब मस्के यांची निवड झाली.तर माझी सरकार या वार्तापत्राचे केज तालुका प्रतिनिधि रविंद्र मेटे यांची सचिव पदी, उपाध्यक्ष ज्योतीराम सांवत, कोषाध्यक्ष पदी सचीन साखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या वेळेस संघातील सर्व सदस्य अनिल गलांडे, श्रीराम तांदळे, रोहन गलांडे, वाजेद शेख, अशोक भोसले, हनुमंत गव्हाणे सर्व सदस्य उपस्थित नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
