Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

युसुफवडगाव पोलिसांनी दारूची वाहतूक करणारी कार पकडली दारूसह ४ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 12, 2026No Comments2 Mins Read

युसुफवडगाव पोलिसांनी दारूची वाहतूक करणारी कार पकडली

दारूसह ४ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

गौतम बचुटे, केज :- युसुफवडगाव पोलिसांनी अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणारी एक स्विफ्ट कार ताब्यात घेत त्यातून वाहतूक करण्यात येत असलेल्या दारुसह ४ लाख ६१ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

दि. १० ऑक्टोबर रोजी युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पोलिस हेडकॉन्स्ट शेंडगे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले, गृह रक्षक दलाचे जवान पौळ आणि राउत हे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गस्त घालीत असताना एका गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, चोरटी व अवैद्यरित्या दारू विक्री करण्यासाठी सदर कारमधून दारूची वाहतूक करण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलिस पथकाने ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी त्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलिस पथक केज कळंब रोडवरील माळेगाव येथील चौकात हजर झाले आणि त्यांनी सापळा लावला.
रात्री ११:३० वा. च्या सुमारास कळंब कडुन स्विफ्ट डिझायर कार क्र. (एम एच-२४/ए बी-०२४९) कळंबकडून केजच्या दिशेने जात असल्याने पोलिसांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी इशारा करून कार थांबविली. कार चालक अजीत अभिमन्यु सरवदे, वय (४६ वर्षे, रा. साबला ता. केज) यांच्या ताब्यातील कारची पंचासमक्ष झडती घेतली असता त्या कारमध्ये क्लासिक गोल्ड आणि टू बर्ग व्हिस्की अशा एकूण रु. ११ हजार ८०० रु. किमतीच्या ७१ बाटल्या आढळून आल्या.
पोलिसांनी दारू सह कार ताब्यात घेऊन ४ लाख ६१ हजार ८०० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले यांच्या तक्रारी वरून अजित अभिमन्यू सरवदे याच्या विरुद्ध गु र नं २७७/२०२६ नुसार महाराष्ट्र दारू बंदीचे काम ६५(इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास हेडकॉस्टेबल संपत शेंडगे करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 85
विजयराज आरकडे

Related Posts

चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार – लक्ष्मणराव मोरे (गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न)

October 12, 2026

कळंब ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे केजपर्यंत; आठवा आरोपी रेवण सोपान नखाते जेरबंद, केज शहरात प्रचंड खळबळ; स्थानिक ड्रग्ज पेडलर्स आणि खरेदीदारांचे धाबे दणाणले

October 10, 2026

दु:खदघटना-आदर्श शिक्षक मुब्बशीर अमिनोद्दीन इनामदार यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

September 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 5 0 4 5 0
Total Users : 150450
Views Today : 16

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.