दु:खदघटना-आदर्श शिक्षक मुब्बशीर अमिनोद्दीन इनामदार यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू
केज-
आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद उर्दू कन्या प्राथमिक शाळा रॊझा मोहल्ला येथे मुलांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकर चा पाईप टाकीत सोडत असताना विजेच्या तारेला स्पर्श झाला व त्यातच ते जमिनीवर कोसळले. त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. केजच्या शैक्षणिक विश्वाने एक चांगला शिक्षक गमावला. ते 51 वर्षाचे होते.
मुब्बाशीर सर, अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावाचे शिक्षक होते..प्रत्येकाशी त्यांचं वागणं अत्यंत सन्मानपूर्वक असायचे..सार्वजनिक कार्यात त्यांचा पुढाकार होता..
मुब्बाशीर सरांना केजवासियांची भावपूर्ण आदरांजली..श्रद्धांजली..
