अहिल्यादेवींचे विचार सर्वांच्या मनावर रुजले पाहिजेत –
ह भ प संभाजी महाराज धूळगंडे
केज-
गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती रथामध्ये घेऊन पायी दिंडी 31 मे पर्यंत चौंडी ला जात असते या वर्षी या दिंडीचे आगमन बुधवार रोजी दुपारी केज येथे झाले.
केज शहरात नागरिकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन स्वागत केले .रथयात्रा दिंडीसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ह भ प संभाजी महाराज धुळगंडे,प्रा डॉ मुरहरी कुंभारगावे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ कुंभारगावे म्हणाले अहिल्यादेवी होळकरांचे विचार समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे मत व्यक्त केले.
अहिल्यादेवीचे विचार सर्वांच्या मनावर रुचले पाहिजेत असे मत ह भ प संभाजी महाराज धुळगंडे यांनी व्यक्त केले
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विचाराचा जागर करत ही दिंडी अहिल्यादेवींचे चे जन्मस्थळ चौंडी येथे 31 मे रोजी जयंती दिनी पोहोचणार आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी केज शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दर्शना सह प्रबोधन कार्यक्रम घेण्यातआला. गुणवंत विद्यार्थि यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब गाढवे, शिवाजी
चेपट ,अशोक गाढवे, ओम चादर, कृष्णा रोडे, देवा लोंढे प्रकाश जाडकर, बालू भुतकर जयदेव रोडे, बब्रू रोडे
,अण्णा रोडे,रोहिदास गाढवे,वसंत सौदागर, बालाजी चादर,शहादेव सौदागर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत सौदागर यांनी केले
दर्शन सोहळ्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
