तळागाळातील प्रश्नांची जाण असणारा चेहरा म्हणजे रमेशरावजी आडसकर
बस्स नामही काफी है..!
रमेश आडसकर यांनी राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून केली. ते प्रथमच जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेले अन् उपाध्यक्ष ही झाले. या प्रमाणे यशस्वी सुरुवात झाली. यावेळी त्यांनी संधीचे सोने करत विविध योजनेच्या माध्यमातून अनेक कामे करुन जिल्हा परिषदेच्या पदाची आणि त्यांच्यातील विकास कामे करण्याची चुणूक दाखवून दिली. ग्रामीण भागाचे नेतृत्व करताना त्यांनी वस्ती,तांडे, वाडी पर्यंत आणि अत्यंत सामान्य माणसापर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे रमेश आडसकर म्हणजे तळागाळातील प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते.
आडसकर म्हटले की, हबाडा याची आठवण होते. माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. यामुळे आडसकरांचे नाव घेतल्याशिवाय जिल्ह्याच्या राजकारणाची चर्चा पुर्ण होऊच शकत नाही. तोच वारसा रमेश आडसकर चालविला आहे. त्यांना बालपणापासून राजकारणाचे बाळकडू वडील बाबुरावजी आडसकर यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. परंतु त्यांची प्रत्यक्ष राजकारणात आसरडोह जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून जिंकली आणि सक्रिय झाले. त्यावेळी ते सदस्य न रहाता राजकीय चाणाक्ष बुद्धीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. या संधीचे सोने करत त्यांनी धारुर, केज तालुक्यात अनेक विकासाची कामे केली. यातून आपल्यातील विकासाची दृष्टी आणि पदाची ओळख निर्माण केली. यानंतर ते दोन ट्रम उपाध्यक्ष,एकवेळा त्यांच्या पत्नी अर्चना आडसकर या उपाध्यक्ष राहिल्या तर सहकारी भारत पिंगळे यांच्या पत्नी शोभा पिंगळे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी उपलब्ध करून दिली. लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली तर अनेक वर्षे मा.आ. बाबुरावजी आडसकर यांचे वर्चस्व असलेला अंबा साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेतला अन् तो चालू करुन कामगार आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला. हे सर्व शक्य झाले ती केवळ त्यांच्यातील सामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे. तर माजलगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक त्यांनी लढवली समोरील प्रकाश सोळंके हे मातब्बर उमेदवार असतानाही अल्प मतांनी पराभव झाला. परंतु या पराभवामुळे ते खचून न जाता आणखी जोमाने कामाला लागले असून, साडेचार वर्ष झाले ते माजलगावात तळ ठोकून असून, सामान्य माणसाच्या सुखदुःखात सामील होत आहेत. याच स्वभावामुळे रमेश आडसकर जातील तिथे लोकांची गर्दी जमल्याची दिसून येते. अशा या जनसामान्यांसाठी काम करणाऱ्या नेत्याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
