केजच्या भवानी चौकात भिषण अपघातात नितीन चाटे वय 35 रा. तांबवा याचा जागीच मृत्यु झाला आहे.
एका अवजड वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वर असलेल्या युवक गाडीच्या चाकाखाली आल्यानंतर त्याचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात आज दुपारी 1 च्या सुमारास झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून म्रतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय केज येथे हलविण्यात आला आहे.
