Author: विजयराज आरकडे

राजमुद्रा गणेश मंडळाने साकारला आकर्षक देखावा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन ..!  केज- केज येथील पंचायत समिती मैदानावर स्थापन झालेल्या राजमुद्रा गणेश मंडळाने याही वर्षी उत्तराखंड राज्यातील श्री केदारनाथ मंदीराचा आकर्षक देखावा साकारला आहे. त्याचे आज दि. १२ रोजी सायंकाळी ८ वा. बीड जिल्ह्यचे खासदार श्री बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे राजमुद्रा गणेश मंडळाचे प्रमुख अमर भैय्या पाटील यांनी कळवले आहे. गेल्या काही वर्षांपासून केज तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षणाचे केंद्र म्हणून राजमुद्रा गणेश मंडळाने आपली ओळख निर्माण केली आहे. त्याच बरोबर हिंदू ,मुस्लिम व इतर सर्व धर्माचे लोक आवर्जून येथे येऊन…

Read More

*वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा* *रेश्मा गायकवाड ठरल्या पैठणीच्या मानकरी* केज प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने तुलसी रामायणाचं आयोजन केलेले आहे या तुलसी रामायण कथेचे प्रवक्ते ह.भ.प बाळासाहेब गेंदले महाराज हे लाभले आहेत तर या कथेची आरती केज विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार अंजलीताई घाडगे यांच्या हस्ते घेण्यात आली वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांसाठी खेळ पैठणीचा आनंद उत्सवाचा या कार्यक्रमांमध्ये एकूण ३५ महिलांनी सहभाग घेतला होता या खेळामध्ये बकेट बॉल संगीत खुर्ची ग्लास सीडी असे विविध खेळ यामध्ये घेण्यात तर ८ तारखेला लहान मुलांचे खेळ घेण्यात आले . यामध्ये लिंबू चमचा रनिंग असे विविध…

Read More

*संयुक्त अरब अमिरातीत कार्यरत असणारे शास्त्रज्ञ यांच्या हस्ते साळेगाव येथे गणपतीची आरती* गौतम बचुटे/केज :- संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथील शास्त्रज्ञ डॉ प्रसन्ना राऊत यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील साळेगाव ता के ज येथील गणपतीची आरती करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. के ज येथील डॉ प्रसन्ना राऊत हे शास्त्रज्ञ म्हणून सेवा देत आहेत. डॉ. प्रसन्ना राऊत यांचे वडील हे केज बीड जिल्हा परिषदेच्या पशू संवर्ध विभागात सहाय्यक पशूधन विकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. तर आई गृहिणी आहे. त्यांचे मामा हे प्रसिद्ध इतिहास संशोधक, साहित्यिक आणि नाट्यकर्मी तथा लेखक डॉ. सतीश साळुंखे आहेत. तसेच चुलते…

Read More

आठ दिवसात केजच्या महामार्गावरील पथदिवे सुरू करा.. केविसंस केज: केज शहरातील महामार्गावरील पथदिवे गेली चार वर्षांपासून रस्ता बांधकाम कारणाखाली बंद आहेत. यामुळे रात्री उशिरा व सकाळी लवकर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी व स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अपघात व इतर प्रकार ही घडत आहेत. या महामार्गावरील पथदिवे तात्काळ सुरू करा या मागणीसाठी समिती संबंधित यंत्रणेकडे सतत पाठपुरावा करत आहे. अगोदर रस्ता काम करणाऱ्या कंपण्या व आता केज नगरपंचायत या कामात विलंब करत आहे. गेली दोन वर्षांपासून वेगवेगळ्या तारखा व आश्वासने दिली गेली आहेत. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. संदल चे आयोजनही होत आहे. तरी केज नगरपंचायत ने…

Read More

*केज परिसरातून राष्ट्रीय खेळाडूं निर्माण व्हावेत:* ,*खासदार बजरंग बप्पा सोनवणे* केज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उदघाट्न प्रसंगी प्रतिपादन* ____________________ _केज प्रतिनिधी_ महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत बीड जिल्हा क्रीडा कार्यालय व गटसधान केंद्र केज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल केज याठिकाणी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेस सुरुवात झाली. स्पर्धेचे प्रमुख उदघाटन मा. खासदार बजरंगबप्पा सोनवणे साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री मा. श्री अंकुशराव इंगळेसाहेब होते तर प्रमुख उपस्थिती श्री. महाजन साहेब पोलीस उपनिरीक्षक केज हे होते. यांचे स्वागत प्रिन्सिपल गणेश कोकीळ सर व क्रीडा संयोजक श्री. विनोद गुंड सर यांनी केले _…

Read More

*केज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलच्या विद्यार्थिनींचा संघ प्रथम.!* केज ! प्रतिनिधी महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग आणि गटसधान केंद्र केज यांच्या व तिने आयोजित तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा आज दिनांक 09 सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल केज येथील मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत केज शहरातील नामांकित विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुल या शाळेचा (14 वर्षीय) मुलींचा संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल संस्थेचे संचालक विजयकांत मुंडे व प्रा.सौ.माधुरीताई मुंडे,शाळेच्या प्रा.अभिलाषा सारंगदेवोत,क्रीडाशिक्षिका तसेच मार्गदर्शिका अंकुरवाड मॅडम यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.स्पर्धेमध्ये चैतन्या पाटील,रेणुका मुंडे,सायली थोरात,सिद्धी लोकरे,काव्या समुद्रे,मधुरा घुले,आर्या जाधव,प्रतिक्षा काळे,जान्हवी गदळे,श्रुती नागरगोजे,जाधव जान्हवी,स्वरा सारुक,सांची साखरे यांनी सहभाग…

Read More

केज तालुक्यात ग्रामस्थांनी संशयित चोर पकडले रात्री फिरणाऱ्या ड्रोनचा लागणार छडा ================ केज- केज तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसापासून चोरांचा सुळसुळाट चालू आहे. गेल्या अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी ड्रोन तालुक्यातील गावातून फिरत होते. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले होते. गावातील नागरिक आपआपल्या गावात गस्त घालत होते त्याच वेळेस कानडी माळी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन दिसले व कांही वेळेत एक संशयित स्कॉर्पिओ गाडी कानडीच्या बस स्टँडवर आली त्याला गावकऱ्यांनी वेढा देऊन विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले गावकऱ्यांनी गाडीची झडती घेतली असता त्यात हत्यारे दिसून आली त्यामुळे गावकऱ्यांनी चोरानां चांगलाच चोप दिला व पोलीसांना कळवले चोर हे चार चाकी गाडी क्रमांक…

Read More

केज रोटरी शिक्षकांसाठीचे “नेशन बिल्डर अवॉर्डस” जाहीर केज : केज रोटरी तर्फे दरवर्षी दिले जाणारे आदर्श शिक्षकांसाठीचे ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ अर्थात ‘राष्ट्र उभारणी शिल्पकार अवॉर्डस 2024’ जाहीर झाले असून केज तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देणाऱ्या दहा शिक्षक-शिक्षिकांना शिक्षकदिनी पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ केज चे विद्यमान अध्यक्ष रो प्रकाश कामाजी, सचिव रो अनंत तरकसबंद, प्रोजेक्ट चेअरमन हनुमंत भोसले, श्रीराम देशमुख, प्रा डॉ बीजे हिरवे यांनी दिली आहे. शिक्षण क्षेत्र हे समाजाचे महत्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात प्रत्येक शिक्षकांचे कार्य महत्वाचे असले तरी जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षण सेवा देणाऱ्या शिक्षकांचे कार्य अत्यंत महत्वाचे…

Read More

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने डॉ अंजलीताई घाडगे यांचा सत्कार केज केज विधानसभा मतदार संघाच्या म. वि. आ. च्या संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे अशा डॉ अंजलीताई घाडगे यांचा जिजाऊ ब्रिगेडच्या बीड जिल्हा अध्यक्षा राधाबाई सपकाळ यांनी व महिला पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार करून होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

डॉ अंजलीताई घाडगे यांचा केज मतदारसंघात वाढता जनसंपर्क प्रतिभावंत उमेदवार म्हणून पसंती मिळत असल्याचे चित्र केज- आगामी विधानसभा केज मतदारसंघातून डॉ अंजलीताई घाडगे यांनी शरदचंद्रजी पवार रा. कॉ. यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असून. त्यांच्या संपर्क दौर्याला वाढता जनसंपर्क मिळत असून प्रतिभावंत उमेदवार म्हणून त्यांच्याकडे केज मतदारसंघातील मतदार पाहत आहेत. डॉ अंजलीताई घाडगे यांनी विधानसभा २०१४ ची निवडणूक लढवली होती. त्यावेळी चांगले मतदान घेऊन चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्या सातत्याने मतदारसंघातील सामाजिक, राजकीय, क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन काम करत राहिले आहेत. यावेळी त्यांना मतदारसंघातील सर्व समाजातील नागरिक महीला, पुरुष यांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Read More