Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज येथील नीटची तयारी करत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार !* *शरीरसंबंधाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार केला अत्याचार !* *आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या !*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 12, 2024No Comments4 Mins Read

*केज येथील नीटची तयारी करत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार !*

*शरीरसंबंधाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार केला अत्याचार !*

*आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या !*

*गौतम बचुटे/केज :-* नीटची तयारी करीत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. मोबाईलवर पीडितेच्या नग्न फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर पुन्हा वारंवार १० ते १२ वेळा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, सुमारे नऊ महिन्या पूर्वी जानेवारी २०२४ मध्ये केज येथील एक लातूर येथे वैद्यकीय पात्रता परीक्षा नीटची तयारी करीत असलेली महाविद्यालयीन १९ वर्षाची तरुणी ही लातूरला जाण्यासाठी बसची वाट पहात थांबली असता; तिच्या ओळखीचा व सोशल मीडियावर ओळख झालेला एका आरोपी तरुणाने तेथे आला. तो तिला म्हणाला की, तो पण लातूरला जात आहे. असे म्हणून त्याने त्या युवतीला त्याच्या चारचाकी कार मध्ये बसविले. केज पासून पुढे ७० किमी अंतरावर असलेल्या रेणापूर येथील एका हॉटेलवर त्याने गाडी थांबवीली. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने त्या हॉटेलच्या एका रूम मध्ये घेवून गेला. त्याने रूमचा दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी तिने आरडा-ओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून तिचे अंगावरचे सर्व कपडे काढून त्याने तिच्या इच्छे विरुद्ध तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्या लैंगिक अत्याचाराचे त्याने मोबाईल मध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्या नंतर त्याने; तिने जर हा प्रकार कुणाला सांगितला तर ते सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या नंतर त्याने तिला लातूर येथील हॉस्टेलवर नेवून सोडले. त्या प्रकार नंतर तो तिला वारंवार फोन करून तिचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आणि तिच्या आई वडीलासह नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविण्याची धमकी देवून तिला ब्लॅकमेल करून तिच्या सोबत त्याने अनेक वेळा सुमारे १० ते १२ वेळा लैंगिक अत्याचार केला. भीतीपोटी व कुटुंबाच्या इज्जतीपोटी पीडित तरुणी हे सर्व सहन करीत होती. त्या नंतर एके दिवशी आरोपी याने ते सर्व व्हिडिओ आणि फोटो हे तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर पाठवून दिले.
त्या नंतर आई-वडिलांनी त्या तरुणीला याचा जाब विचारल्या नंतर तिने सर्व प्रकार सांगितला. त्या नंतर त्यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या सर्व प्रकारची कल्पना दिल्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक यांचे लेखनिक पोलीस नाईक संतोष गित्ते यांच्या मदतीने पीडित तरुणीची तक्रार नोंदवून घेतली.
तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपी याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८५/२०२४ भा. न्या. सं. २०२३ अधिनियम कलम ६४(१), ६४(२)(एम), ३३२(ब), ११५(२), ३५२, ३५१(१), ३५१(२) यासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(२) (पाच), ३(२)(व्ही ए), ३(१)(आर), ३(१)(एस) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६, ६६(ई) नुसार बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि आय टी ॲक्ट नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हा प्रकार गंभीर असल्याने आरोपी फरार होवू नये याची दक्षता घेत केज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे आरोपी याच्यावर पाळत ठेवून गुन्हा दाखल होताच त्याच्या मुसक्या आवळल्या.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.
________________________

*इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली ! :-* पीडित तरुणीने आणि आरोपी यांची इन्स्टाग्रामवरची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारली. त्या नंतर त्यांची इन्स्टाग्रामवरची ओळख झाली त्यातून ते एकमेकांशी बोलत होते. त्याचा गैरफायदा घेत तो एके दिवशी तिच्या हॉस्टेलवर गेला आणि त्याने फोन करून बाहेर बोलावून घेतले व ते दोघे मोटार सायकलवर शहरात फिरले.
________________________

*लॉजचाही गोरख धंदा :-* त्या तरुणीने तक्रारीत तिच्यावर वारंवार ज्या लॉज मध्ये अत्याचार झाला त्या लॉजमध्ये त्यांचे ओळख पत्र किंवा आधार कार्ड न पाहता त्यांना रूम कशी काय दिली? याचाही पोलीस तपास होईल.
________________________

*बळजबरीने घरात घुसून माथ्यावर कुंकू लावून लग्न केल्याची सेल्फी काढली :-* जून २०२४ मध्ये ती तरुणी ही एकटी घरी असताना आरोपी हा तीच्या घरात घुसला. त्याने जबरदस्तीने तिच्या डोक्यावर सिन्दुर लावून त्याचा सेल्फी काढला व “तू माझी बायको झालीस .” असे म्हणून पुन्हा तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक संबंध केला.
_______________________

________________________

*आई-वडिलांकडे तिच्याशी लग्न करण्याची धमकी देत फोटो व व्हिडिओ केले व्हायरल :-* आरोग्य याने दि. ९ सप्टेंबर रोजी पीडित तरुणीच्या वडिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटून त्यांच्या मुली सोबत लग्न करण्याची धमकी दिली आणि त्या नंतर त्याने तिचे नग्न फोटो व त्याच्या सोबतचे लैंगिक संबंधाचे व्हडिओ पीडित तरुणीच्या आई वडिलांच्या मोबाईलवर व्हायरल केले.
________________________

पीडित तरुणीचे आई-वडील हे प्रचंड दडपण आणि तणावाखाली असून त्यांनी आरोपी याच्या भीतीपोटी त्यांचे घर विकून गाव सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.
________________________

जर असे छेडछाड किंवा अत्याचाराचे प्रकार होत असतील तर निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा तसेच कुणाला अशा प्रकाराची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणारांचे नाव गुप्त ठेवून कठोर कारवाई केली जाईल.
—-*प्रशांत महाजन,*
पोलीस निरीक्षक, केज पोलीस ठाणे
________________________

विजयराज आरकडे

Post Views: 36
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.