Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आठ दिवसात केजच्या महामार्गावरील पथदिवे सुरू करा.. केविसंस

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 10, 2024No Comments2 Mins Read

आठ दिवसात केजच्या महामार्गावरील पथदिवे सुरू करा.. केविसंस

केज: केज शहरातील महामार्गावरील पथदिवे गेली चार वर्षांपासून रस्ता बांधकाम कारणाखाली बंद आहेत. यामुळे रात्री उशिरा व सकाळी लवकर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी व स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अपघात व इतर प्रकार ही घडत आहेत. या महामार्गावरील पथदिवे तात्काळ सुरू करा या मागणीसाठी समिती संबंधित यंत्रणेकडे सतत पाठपुरावा करत आहे. अगोदर रस्ता काम करणाऱ्या कंपण्या व आता केज नगरपंचायत या कामात विलंब करत आहे. गेली दोन वर्षांपासून वेगवेगळ्या तारखा व आश्वासने दिली गेली आहेत. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. संदल चे आयोजनही होत आहे. तरी केज नगरपंचायत ने केज शहरातील बीड-अंबेजोगाई महामार्ग, धारूर रोड महामार्ग व कळंब रोड चे बंद असणारे पथदिवे येत्या आठ दिवसात सुरु करावेत, तसेच शहरातील इतर रस्त्यांची अत्यंत संथ गतीने सुरू असलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत व लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे काम उत्कृष्ट दर्जासह वेळेत पूर्ण करावेत नसता येत्या 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 पासून वरील मागण्यासाठी केज नगरपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे समितीच्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले यांनी कळविले आहे.
याबाबत केज विकास संघर्ष समितीने वरील सर्व मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. वास्तविक पाहता हा विषय आंदोलने किंवा निवेदनाचा नाही. नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या अत्यावश्यक व मुलभूत सुविधांचा विचार करून तात्काळ या समस्या स्वतः सोडवायला हव्या आहेत. मात्र या अत्यावश्यक व गंभीर समस्येकडे केज नगरपंचायत व तालुका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची जनतेची भावना बनली आहे. म्हणून नागरिकांना शेवटचा पर्याय म्हणून आंदोलनासाठी रस्त्यावर यावे लागत आहे.
यासाठीच येत्या आठ दिवसात वरील समस्या नगरपंचायत व तालुका प्रशासनाने न सोडवल्यास येत्या 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता समिती बेमुदत आमरण उपोषण सुरू करत आहे.
निवेदनावर हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, संपत वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 56
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 5
Total Users : 149335
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.