Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे सौ. सारिकाताई सोनवणे आणि डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण* *बक्षीस वितरण कार्यक्रमात रंगले उखाणे !*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 13, 2024Updated:September 13, 2024No Comments2 Mins Read

*गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे सौ. सारिकाताई सोनवणे आणि डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण*

*बक्षीस वितरण कार्यक्रमात रंगले उखाणे !*

केज :- खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या धर्मपत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिकाताई बजरंग सोनवणे आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सौ. डॉ. अंजलीताई घाडगे यांनी महिलांनी गौरी गणपती सजावट आणि आरास करणाऱ्या महिलांसाठी स्पर्धा आयोजित केलेल्या उत्कृष्ट देखावे आणि सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी उपस्थित महिलांनी उखाणे सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
केज विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नेत्या डॉ. अंजलीताई घाडगे यांनी खा. बजरंग सोनवणे यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिकाताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज शहरातील महिलांसाठी गौरी-गणपतीच्या सणा निमित्त महिलांनी घरोघरी केलेल्या सजावटीची आणि देखाव्यांची केलेली आरास याची दखल घेत त्यांनी उत्कृष्ट आणि सामाजिक आशय व संदेश देणारे सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या सजावटीसाठी त्यांनी स्पर्धा आयोजित केली होती.

दि. १३ सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात याचे बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या महिलांना खा. बजरंग सोनवणे यांच्या अर्धांगिनी सौ. सारीकाताई सोनवणे आणि डॉ. अंजली ताई घाडगे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई देशमुख, जिल्हा संघटक तसलीम बागवान, तालुका अध्यक्ष तसलीम इनामदार, सौ. कविताताई कराड, तालुका अध्यक्ष शितलताई लांडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष राधाताई सकपाळ, सुनीता डबरे, अर्चना इंगळे, रेखाताई वाघमारे यांच्या उपस्थितीत आकर्षक बक्षीस देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रथम पारितोषिक हे प्रीती कलढोने (लेक वाचवा), प्रतीक्षा नाईकवाडे (मराठा आरक्षण) या देखाव्यासाठी देण्यात आले. द्वितीय पारितोषिक हे गौरी लांडगे (धनलक्ष्मी), सौ. अनुराधा जाधव (महिला सक्षमीकरण) या देखाव्याला देण्यात आले. तसेच तृतीय पारितोषिक हे पल्लवी सत्वधर (शंकर पार्वती विवाह सोहळा), सुवर्णा सांगळे (सिरसट)   (आरोग्य व महिला सक्षमीकरण) आणि सावित्री तपसे यांच्या देखाव्याला देण्यात आले.
तसेच कविता कराड (कैलास पर्वत), वर्षाताई (महिला सक्षामीकरण), प्रज्ञा कोकीळ (स्वच्छता), मंदोदरी पांचाळ (महिला व आरोग्य), ज्योती पाटील (ग्रामीण जिवन), रंजना पवार (लग्न समारंभ), ज्योती गायकवाड यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी उपस्थित महिलांनी उखाणे घेत कार्यक्रमाची रंगत वाढवून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

विजयराज आरकडे

Post Views: 39
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 1
Total Users : 148111
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.