Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

पप्पू कागदे यांची महायुती मधील रिपाईकडून केज विधानसभा लढण्याची तयारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत कामाला लागण्याचा दिला सल्ला !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 12, 2024No Comments2 Mins Read

पप्पू कागदे यांची महायुती मधील रिपाईकडून केज विधानसभा लढण्याची तयारी

कार्यकर्त्यांच्या बैठकीत कामाला लागण्याचा दिला सल्ला !

गौतम बचुटे/केज :- येत्या विधान सभेसाठी केज राखीव मतदार संघातून रिपाइंचे उमेदवार म्हणून पप्पू कागदे हे देखील तयारी करीत असून त्यांनी कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बैठकीत दिले. तसेच केजची जागा महायुतीमध्ये रिपाइंला सोडवून घेण्या संदर्भात ना. रामदास आठवले हे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. जर महायुती मधून ही जागा पप्पू कागदे यांनी लढविली; तर त्याचा फायदा जिल्ह्यात महायुतीला होणार आहे.

ना. रामदासजी आठवले हे केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री झाले असल्याने ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा बीड येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्या निमित्ता गुरुवार दि. १२ सप्टेंबर रोजी केज येथील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात सकाळी ११:०० वा. पप्पू कागदे यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

यावेळी बोलताना पप्पू कागदे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, सर्वांनी अंग झटकुन कामाला लागावे. तसेच कार्यकर्त्यांनी सर्व समाजात जावून आपण केलेल्या कामांची माहिती द्यावी, तसेच आपल्या ऐक्याची ताकद दाखवावी, चळवळीच्या माध्यमातून रिपाइं जिल्ह्यातील पाच हजार हेक्टर गायरान जमिनी कास्तकऱ्यांच्या नावावर केलेल्या आहेत. तसेच सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना विकास कामात मदत केलेली असल्याने आपण निवडणूक लढविण्यास हक्कदार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठ्ठकीला जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, मराठवाडा संघटक राजू जोगदंड, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, प्रभाकर चांदणे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, कार्याध्यक्ष आश्रुबा तुपारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, युवा रिपाइंचे निलेश ढोबळे, राजेश सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे, उपाध्यक्ष रमेश निशिगंध, विकास आरकडे, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, प्रशांत हजारे, मंजू ताई बनसोडे, सरस्वती शिनगारे, कोमल कांबळे, रोहित बचुटे, नाना गायकवाड, सूरज काळे, मिलिंद भालेराव, मसू बचुटे, भगवान कांबळे,नवनाथ खाडे, हरेंद्रा धीरे, शहाबुद्दीन शेख, भारत गायकवाड, नितीन घोडके, राहुल बचुटे, रुपचंद ढालमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 45
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 1
Total Users : 148111
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.