*गेल्या पाच वर्षापासून जनतेच्या सुख दुःखात सामिल असलेले रमेशराव आडसकर यांची सर्व सामान्य माणसात सहानुभूतीची लाट*
*माजलगाव मतदारसंघातून निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार*
वडवणी- *जगदीश गोरे*
गेल्या विधानसभा निवडणुकीत रमेशराव आडसकर यांचा अल्पशा मताने पराभव झाला, परंतु हा पराभव विसरून आडसकर यांनी मतदारसंघातील जनतेच्या सुख:दुखात सहभागी होऊन जनतेशी आपुलकीचे नाते निर्माण झाले असून आजी आमदार यांच्या पेक्षाही ते मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे असल्याचे चित्र असल्याने मतदारसंघात त्यांच्याविषयी सहानुभुतीची लाट निर्माण झाली असून यावेळी माजलगाव मतदारसंघातून रमेशराव आडसकर यांना निवडून देण्याचा निर्धार मतदाराने केला असल्याचे बोलले जात आहे. लं
———-
जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम रमेशराव आडसकर यांनी केले असल्याने रमेशराव आडसकर यांची सर्वसामान्य माणसात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. पराभव झाला यामुळे या पराभवाचे शल्य जनतेच्या मनात सहानुभूती आहे यामुळे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून रमेशराव आडसकर यांच्याकडे पाहिले जात आहे.
पराभवानंतर आडसकर खचून न जाता पुन्हा तयारीनिशी माजलगावच्या मैदानात उडी घेतली. आणि मैदान गाजवण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षापासून आडसकर हे करत आहेत. माजलगावच्या मैदानावर सोळंके यांच्याशी दोन हात करीत आहेत. वेळोवेळी आंदोलने करुन लक्ष वेधून घेत आहेत. तसेच पक्षाचा प्रत्येक कार्यक्रम, चळवळ, बैठका, मेळावे, भेटीगाठी घेत आहेत.
शिवाय गेल्या पाच वर्षात पक्षात लोक चळवळीवर लाखो रुपये खर्च केले आहेत.
भाजपाचे नेते रमेशराव आडसकर हे कायम माजलगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या संपर्कात राहिले. मतदारसंघातील जनतेच्या सुख दुःखामध्ये ते सहभागी झाले आज त्यांच्या या स्वभामुळेच संपूर्ण मतदारसंघात त्यांची लोकप्रियता वाढली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली की अनेक भावी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसताता परंतु जनतेमध्ये मात्र रमेश आडसकरांचीच जोरदार चर्चा होत आहे. अन् जर जनतेने निवडणूक हातात घेतली तर जनता विजयाचा गुलालच लावते असा इतिहास आहे.
त्याच पद्धतीने रमेशराव आडसकरांची ही निवडणूक माजलगाव मतदार संघातील जनताच ताब्यात घेणार असून त्यांना ह्या वेळेस प्रचंड मताधिक्याने रमेश आडसकरांना विजयी करण्याचा संकल्पच जणू जनतेने केला असल्याचे बोलले जात आहे. माजलगाव विधानसभा मतदार संघातील प्रभावी आणि तगडे नेतृत्व रमेशराव आडसकर यांनी सध्या संयमी भुमिका घेतली आहे. कारण आज आडसकर साहेब विधानसभेचे उमेदवार आहेत.
कार्यकर्ते व जनतेत अशीही चर्चा आहे की आडसकर साहेबांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी घेतली तरी त्यांना यावर्षी आमदार करण्याचाच निर्धार मतदारांनी केला आहे.
