30 दिवसात येडेश्वरी युनिट नं.1 चे 2 लाख गाळप पूर्ण केज (प्रतिनिधी) -आनंदगांव(सा) येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.1 ने दि. 16. नोव्हेंबर 2024 रोजी 11 व्या गळीत हंगामाची सुरुवात केली. आणि आज 16 डिसेंबर 2024 रोजी कारखान्याने दोन लाख टन गाळप करून ठरवलेल्या उद्दिष्टाकडे योग्य रीतीने वाटचाल चालू आहे. कर्मचा-यांनी एकमेकांचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.येडेश्वरीची प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात 16 नाव्हेंबर 2024 झाली होती. आज रोजी 30 दिवसांमध्ये कारखान्याने 2 लाख टन गाळप करून साखरेचे उत्पादन 87हजार 250 क्विंटल घेतले. कारखाना प्रतिदिवस 7000 मे टन सरासरी प्रमाणे गाळप करीत आहे. तसेच कारखान्याच्या आसवानी प्रकल्पात इथेनॉल 19 लाख 37 हजार…
Author: विजयराज आरकडे
सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात केज ! प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. आरोपी विष्णू चाटे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. ते स्वतः शरण आल्याचे समजते. हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, आता चौथ्या आरोपीला अटक केलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या…
आज केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन; बंद पुकारला नसल्याने केज शहर सुरळीत चालू राहील केज/प्रतिनिधी आज बुधवारी केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदर मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना दलित समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र बंदची हाक दिली नसल्याने सर्व व्यवहार,दुकाने, शाळा सुरू राहील असे कार्यकर्ते यांनी कळवले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक केज, येथून शहरातील मुख्य रस्त्याने दलित आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा…
संतोष देशमुख हत्याकांडाची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशा मार्फत व्हावी — रोहित पवार बीड जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे — आ. रोहित पवार गौतम बचुटे/केज :- संतोष देशमुख यांच्या हत्याकांड हे दुर्दैवी असून मास्टर माईंडला वाचविले जात असल्याचा आरोप रोहीत पवार यांनी सरकारवर केला. तर या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली. कारण एसआयटी आणि निव्वळ वेळ काढूनपणा असून अशा प्रकारच्या अनेक चौकशा होतात. परंतु पुढे काय होते हे आपण पाहिले आहे. असे ते म्हणाले. तसेच याचा तपास करण्यासाठी मुंख्यमंत्र्यानी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. दि. १७ डिसेंबर रोजी आ. रोहित पवार हे मस्साजोग येथील…
पंकजाताई मुंडे यांना भाजपाकडून मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता पक्षाकडून फोनवरून माहिती दिली असल्याची चर्चा मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तीमत्व पंकजाताई मुंडे यांना भाजपा पक्षाकडून फोनवरून मंत्रीमंडळात समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली असल्याचे वृत्तवाहिनी वरून सांगण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचाराने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात सभा घेऊन आमदार निवडून आणले आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यातील मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समजते.
देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मा.खासदार पाटील केज . – तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या वेदनादायी आहे. घटनेच्या सात दिवसानंतरही सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. आपण संसदेत हा विषय लावून धरू अशी भावना खासदार रजनीताई पाटील यांनी व्यक्त केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शनिवारी खासदार रजनी पाटील यांनी भेट घेतली. देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर रजनी पाटील यांनी आपण देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. यातील सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत असे सांगितले. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार…
अपघाती निधन झालेला मित्र राहुल मुंडे नावाने प्रतिष्ठानची स्थापना ; दत्त जयंती सामाजिक उपक्रमाने केली साजरी; सर्वत्र होत आहे कौतुक केज- प्रतिनिधी केज शहरातील शिक्षक कॉलनी भागातील कर्तबगार युवक राहुल प्रकाश मुंडे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद अपघाती निधन झाले आहे. राहुल मुंडे हा कर्तबगार युवा तरूण होता. त्याच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल मुंडे चा मोठा मित्र परिवार आहे. या सर्व राहुल च्या जिवलग मित्रांनी राहुल मुंडे प्रतिष्ठान ची स्थापना केली आहे. राहुल प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस या तरुण युवकांनी राहुल प्रतिष्ठानची स्थापना करताना व्यक्त केला होता.याकामी त्यांना एम.डी घुले सर, सुधाकर ढाकणे…
केज कडकडीत बंद केज- सकल मराठा समाजाच्या वतीने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेध नोंदवून फरार आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात यावे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यास संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी, नागरिक यांनी प्रतिसाद देत बंदला पाठींबा दिला. ज्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे ही अमानवीय घटना घडली आहे. केज सह तालुक्यात कडकडीत बंद पाहावयास मिळाला, शाळा, दुकाने, खाजगी व्यवसाय नागरीकांनी स्वंयमपने बंद ठेऊन बंदला आपला पाठिंबा दिला आहे. शहरातून सकल मराठा युवकांनी पायी फिरून बंदचे आवाहन करत केज पोलीस ठाण्यात जाऊन फरार आरोपींना अटक करा या मागणीसाठी घोषणाबाजी देखील केली आहे.
*ओजस अनिल कुलकर्णी ची इस्रो अभ्यास सहलीसाठी निवड* माजलगाव:- नोबेल फांऊडेशन आणि भवरलाल जैन फांऊडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च (NSTS) ही परीक्षा घेतली जाते, यात प्रथम पात्रता परीक्षा नंतर लेखी परीक्षा आणि त्यात निवड होणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांची मुलाखत परीक्षा घेतली जाते, या तिन्ही अडथळ्यांच्या परीक्षा पूर्ण केल्यानंतर इयत्ता निहाय विद्यार्थ्यांची निवड केली जाते, या परीक्षेत यश मिळवून निवडलेल्या विद्यार्थ्यांना या फाऊंडेशन मार्फत प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देण्यात येतेच परंतु या बाल वैज्ञानिकांना इस्रो या भारतीय अवकाश संशोधन केंद्र या ठिकाणी अभ्यास सहलीला जाण्याची संधी मिळते.शहरातील सिंधफणा पब्लिक स्कुल माजलगाव याठिकाणी इ.8वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी चि.ओजस…
सरपंच देशमुख खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीस पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात ; बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई केज – जिल्हा हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग खून प्रकरण तपासात पोलिसांनी आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीस बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात बेड्या ठोकल्या. प्रतिक भीमराव घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खून केल्यानंतर प्रतिक घुले पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी यापूर्वी जयराम माणिक चाटे (वय २१ रा. तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता.…