Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आज केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन; बंद पुकारला नसल्याने केज शहर सुरळीत चालू राहील

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 18, 2024No Comments2 Mins Read

आज केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन;

बंद पुकारला नसल्याने केज शहर सुरळीत चालू राहील

केज/प्रतिनिधी

आज बुधवारी केज येथे दलित समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदर मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना दलित समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे.
मात्र बंदची हाक दिली नसल्याने सर्व व्यवहार,दुकाने, शाळा सुरू राहील असे कार्यकर्ते यांनी कळवले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक केज, येथून शहरातील मुख्य रस्त्याने दलित आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा काढून तहसीलदार केज यांना तालुक्यातील दलित समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
केज शहरात निघणाऱ्या दलित समाज बांधवांच्या मोर्चाचे कारण असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरिल संविधान शिल्पलेखाची मोडतोड करून विटंबना करून दलित समाजाच्या भावना दुखावल्या त्या आरोपीस कडक शिक्षा व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी अवदा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मस्साजोग येथील दलित कर्मचारी भगवान सोनवणे यास मारहाण केली त्या गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करून शासन करावे, मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून त्यांचे अमानुषपणे क्रूरतेने मारहाण करून त्यांचा निघृणपणे खूण करणाऱ्या सर्व आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी,
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी तसेच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवारास शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी,
मा. दंडाधिकारी केज यांनी केज तालुक्यातील दलित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये दिवसांनी दिवस वाढ होत आहे. त्यामुळे अनुसूचित घटक समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे न्यायदांडाधिकारी साहेबांनी सदर घटनेवर कायद्याचा धाक व प्रशासनाची कडक नजर राहावी याकरिता आपल्या अध्यक्षतेखाली शासन समितीची स्थापना करून त्यामध्ये सामाजिक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात यावा असे तहसीलदार केज यांना लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या लेखी निवेदनावर अशोक गायकवाड, योगेश भाई गायकवाड, लखन हजारे, रोहित कसबे, सुंदर खाडे, सुनील हिरवे,संतोष ठोके, निलेश साखरे,धीरज मस्के, बापू गायकवाड,अनिल उजगरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 136
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 9
Total Users : 146039
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.