Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 25, 2026No Comments1 Min Read

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान;

तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

केज- प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसुफवडगाव व आडस मंडळ परिसरात दि. 23 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, वीज व्यवस्था तसेच नागरिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच मौजे सोनिजवळा येथील शेतकरी कै. दिगांबर ससाणे यांचा अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
वादळामुळे अनेक गावांमध्ये वीज पोल व तारा धोकादायक अवस्थेत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली.
हे निवेदन अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा केज पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते मा. ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अंकुशराव इंगळे, युवा नेते मा. रणजितदादा आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री अमर पाटील, युवक अध्यक्ष श्री शिवदास थळकरी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष श्री गोविंदराव ससाणे, बाजार समितीचे संचालक तथा सरपंच श्री कैलास पाटील, श्री सुशिलभैय्या अंधारे, श्री कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 123
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 8
Total Users : 149338
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.