पंकजाताई मुंडे यांना भाजपाकडून मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता
पक्षाकडून फोनवरून माहिती दिली असल्याची चर्चा
मुंबई-
भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तीमत्व पंकजाताई मुंडे यांना भाजपा पक्षाकडून फोनवरून मंत्रीमंडळात समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली असल्याचे वृत्तवाहिनी वरून सांगण्यात आले आहे.
पंकजाताई मुंडे यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचाराने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात सभा घेऊन आमदार निवडून आणले आहेत.
त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यातील मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समजते.
