जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन;
देशमुख हत्या व परभणीतील येथील दोषींवर कठोर कारवाई करावाईची मागणी;
बीड (प्रतिनिधी)
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावे तसेच परभणी येथील आंदोलनकर्ते व संविधानरक्षक ॲड. सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेत दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा
सेवा संघ प्रणित जिजाऊ बिग्रेडच्या वतीने पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बीड येथे मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ बिग्रेडच्या वतीने पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जाहिर निषेध करण्यात येत आहे.तसेच परभणी येथील पोलीस कोठडीत ॲड. सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, यांना ही पाठवण्यात आले आहेत
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा राधाबाई सपकाळ, वर्षाताई माने ( प्रदेश उपाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड) निर्मला सातपुते (बीड जिल्हा उपाध्यक्ष) सह जिजाऊ ब्रिगेडच्या महीला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
