Author: विजयराज आरकडे

मराठा सेवा संघाची केज येथे बैठक विविध पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर केज – मराठा सेवा संघाची बैठक केज येथे सोमवार रोजी संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव होते. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री नागनाथ जाधव जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे विष्णू तपसे, हनुमंत घाडगे हनुमंत भोसले, गोविंद सपाटे, राधाताई सपकाळ,हिराबाई शेळके ,गोविंद शिनगारे आदींची उपस्थिती होती येणाऱ्या कालावधीत होणारी जिजाऊ प्रबोधन यात्रा विषयी चर्चा करुन या प्रबोधन यात्रेचे विविध ठिकाणी तालुक्यामध्ये विविध प्रकारे स्वागत, कार्यक्रम घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. मराठा सेवा संघ शिवधर्म संस्कार विधी नामदेव तुकोबा विचार कृती प्रणित,…

Read More

शितलताई लांडगे यांना महाराष्ट्र फाउंडेशन यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्कार जाहीर   केज- केज येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षा सौ. शितलताई लांडगे यांना महाराष्ट्र फाउंडेशन यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्कार येत्या १६ मार्चला पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे. सौ. शितलताई लांडगे ह्या सर्वसामान्य कुटुंबातील असून त्या गेल्या दहा वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक विधवा, परितक्ता, गोरगरीब महिलांचे शिक्षण व वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण आणि त्याच बरोबर अनेक महिलांचे उद्योग व्यवसाय उभे करून दिलेले आहेत. त्यांना कित्तेक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे. महिलांचा आर्थिक विकास होण्यासाठी त्या…

Read More

मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही योग्य कारवाई होत नाही- मनोज जरांगे पाटील गौतम बचुटे/केज :- देशमुख कुटुंबाला मुख्य मंत्र्यांनी एकही गुन्हेगार सुटणार आणि असा शब्द दिलेला असताना सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना मदत करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. किंवा त्यांना सहआरोपी केले जात नाही. यावर मनोज दादा जरांगे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते मस्साजोग येथे गावकरी व स्व. संतोष देशमुख कुटुंबाच्या अन्नत्याग आंदोलनास भेट देण्यासाठी दि. २५ रोजी आले होते. तसेच जर मुख्यमंत्री या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कमी पडत असतील; तर त्यांनी देशमुख कुटुंबाच्या आंदोलनात सहभागी होवून केंद्राकडे सखोल तपासाची मागणी करावी. अशी…

Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत केज तालुक्यातील निमशासकीय संस्थेवरील ट्रेनी शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी उपोषणाचा इशारा  केज- कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय क्र. सकीर्ण 2024/प्र.क्र.90/व्याशी 3 दि.09 जुलै 2024 नुसार शिक्षक प्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून दिनांक 26/08/2024 ते दि.25/02/2025 या कालावधीसाठी ट्रेन शिक्षकांचा सर्व शाळेवर गटशिक्षण कार्यालय यांच्यामार्फत मुख्यध्यापकांनी शैक्षणिक पात्रतेनुसार रुजू आदेश देऊन सर्व ट्रेनिंग शिक्षकांची निवड करण्यात आली परंतु जिल्हा परिषद शाळेबरोबर निमशासकीय शालेय संस्थेवरील ट्रेनिंग शिक्षकांची ऑनलाईन माहिती अपलोड केली नाही. गेले पाच महिने झाले आम्ही शाळेत नेहमीप्रमाणे जात आहोत. त्यामुळे आतापर्यंत आम्ही केलेल्या कामाचा मोबदला देण्यात…

Read More

आनंदगाव येथे शिवजन्मोत्सवानिमित्त बाळराजे आवारे पाटील यांचा भव्य सत्कार  केज – तालुक्यातील आनंदगाव येथे छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. शिवजयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जय जिजाऊ जय शिवराय चा जयघोष सर्वत्र घुमला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच अंजना गोविंद गायकवाड, प्रमुख पाहुणे चळवळीत अग्रेसर असणारे, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे बाळराजे आवारे पाटील,सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांचा गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बाळराजे आवारे पाटील म्हणाले छत्रपती शिवरायांचा विचार महाराष्ट्रभर घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. गजानन गुरुकुलचे विद्यार्थी यांनी विविध देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. बाळराजे आवारे…

Read More

बीडचे खा.बजरंग सोनवणेंची परदेशात क्रेझ; शिवजयंतीनिमीत्त आले अबुधाबीतून निमंत्रण; २३ फेब्रुवारी मोठ्या थाटात शिवजन्मोत्सव होणार साजरा  केज- महाराष्ट्रासह देशभरात आणि आता जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यावर्षी अरब देशातील अबुधाबीमध्ये दि.२३ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून बीडचे खा.बजरंग सोनवणे यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरातील विविध देशात साजरी केली जात आहे. महाराष्ट्र आणि हिंदूस्थानातील नागरिक परदेशात आता शिवजयंती साजरी करू लागले आहे. अरब देशातील अबुधाबी येथे मागील सात वर्षांपासून उमेश नळगे पाटील, प्रदिप आघाव हे छत्रपती शिवाजी…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीच केजकरांसाठी आनंदाची अनुभूती केज- आज संपूर्ण भारतभर छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. केज येथेही मोठ्या उत्साहाने शिव जन्मोत्सव साजरा केला जातो. शहरातील तहसील कार्यालय जवळ मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक पुर्वीपासून स्थापना केली होती मात्र महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी समस्त शिव भक्त करत होते. परंतू काही शासकीय बाबींची अडचण येत होती. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीच महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात उभा राहिला आणि सकाळी शिव भक्तांना पाहावयास मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्रच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवभक्तांनी हा अश्वारूढ पुतळा पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.

Read More

शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमाने शिव जन्मोत्सव साजरा   केज- शिवबा प्रतिष्ठान कानडी रोड केज येथील तरूण शिवभक्तांनी शिव जन्मोत्सव निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम राबवत शिव जन्मोत्सव साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे. सरकारी दवाखाना फळ वाटप, वृद्धाश्रम बोबडेवाडी रोड येथे किराणा वाटप व अनाथ आश्रम बीड रोड विद्यार्थ्यांसाठी ड्रेस वाटप करत सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शिवबा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Read More

विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी एकनिष्ठ राहिले पाहिजे- अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके केज प्रतिनिधी: – जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुशराव इंगळे अध्यक्ष, जीवन विकास शिक्षण मंडळ तथा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती केज, तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. चेतनाताई तिडके या उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. वसुदेव नेहरकर उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती केज, संस्थेचे सचिव गिन्यानदेव गदळे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस…

Read More

केज येथे शिव साम्राज्य शिवजन्मोत्सव आयोजित रक्तदान शिबिरात १०० रक्तदात्यांचे रक्तदान केज – केर शहरात छत्रपती शिवराय जयंती निमित्त शिव साम्राज्य जन्मोत्सव समितीने मंगळवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले.शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामाजिक उपक्रमाने केज येथील शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. शिव साम्राज्य शिवजन्मोत्सवाचे अमोल शिंदे, भैय्या शिंदे, सचिन रोडे, रवी दांगट, विलास आवाड, पपू ढगे, यशवंत रितापूरे, संजय गुंड,मुन्ना धनवडे, सागर डिकूळे,अशोक कदम, सारंग शिंदे, अतुल गुंड दुशांत लांब, अक्षय सत्वधर आदित्य विडेकर, शैलेश भूतकार, राहूल गुंड, अशोक रगडे, संतोष असवले अक्षय कदम, मयूर कदम, तुषार सत्वधर रुद्र जाधव आदी सदस्यांनी शिबिराचे नियोजन केले. रक्तसंकलनासाठी माजलगाव रक्तपेढी डॉ…

Read More