मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत केज तालुक्यातील निमशासकीय संस्थेवरील ट्रेनी शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी उपोषणाचा इशारा
केज-
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय क्र. सकीर्ण 2024/प्र.क्र.90/व्याशी 3 दि.09 जुलै 2024 नुसार शिक्षक प्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून दिनांक 26/08/2024 ते दि.25/02/2025 या कालावधीसाठी ट्रेन शिक्षकांचा सर्व शाळेवर गटशिक्षण कार्यालय यांच्यामार्फत मुख्यध्यापकांनी शैक्षणिक पात्रतेनुसार रुजू आदेश देऊन सर्व ट्रेनिंग शिक्षकांची निवड करण्यात आली परंतु जिल्हा परिषद शाळेबरोबर निमशासकीय शालेय संस्थेवरील ट्रेनिंग शिक्षकांची ऑनलाईन माहिती अपलोड केली नाही. गेले पाच महिने झाले आम्ही शाळेत नेहमीप्रमाणे जात आहोत. त्यामुळे आतापर्यंत आम्ही केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा यासंबंधी संबंधित कार्यालयाशी वारंवार संपर्क केला असता आमच्याकडे अशी कुठलीही माहिती नसल्याचे ते सांगत आहे. जर माहिती नाही तर आम्हाला रुजू करून घेण्याचे आदेश दिले कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही लोक आधीच बेरोजगार तरुण होतोत आता सरकारने आम्हाला परत बेरोजगार केले व त्यांची फसवणूक केली. त्यामुळे दिनांक 10/02/2025 रोजी केज तहसीलदार साहेब, गटशिक्षणाधिकारी केज, गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे विनंती केली असता आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची आम्हाला माहिती मिळाली नसल्याकारणाने शिक्षणाधिकारी कार्यालय बीड याठिकाणी निवेदन देऊ उपोषणाचा इशारा देखील देणार आहेत.