आनंदगाव येथे शिवजन्मोत्सवानिमित्त बाळराजे आवारे पाटील यांचा भव्य सत्कार
केज –
तालुक्यातील आनंदगाव येथे छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
शिवजयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जय जिजाऊ जय शिवराय चा जयघोष सर्वत्र घुमला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच अंजना गोविंद गायकवाड, प्रमुख पाहुणे
चळवळीत अग्रेसर असणारे,
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
संघटनेचे बाळराजे आवारे पाटील,सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांचा गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना बाळराजे आवारे पाटील म्हणाले छत्रपती शिवरायांचा विचार महाराष्ट्रभर घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
गजानन गुरुकुलचे विद्यार्थी यांनी विविध देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. बाळराजे आवारे पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास अनावरण करून पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास गावातील नागरिक महिला,विद्यार्थी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत सौदागर यांनी केले तर आभार नामदेव गायकवाड यांनी मानले.