Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ते बीड सद्भावना पदयात्रा संतोष देशमुखांच्या समोर ‘शहीद’ शब्द लागावा – हर्षवर्धन सपकाळ

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 9, 2025No Comments4 Mins Read
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ते बीड सद्भावना पदयात्रा
संतोष देशमुखांच्या समोर ‘शहीद’ शब्द लागावा – हर्षवर्धन सपकाळ
गौतम बचुटे/केज :-
संतोष देशमुख यांच्या समोर हत्या झाली असा नव्हे तर ‘शहीद’ हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय, तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने सद्भावना पदयात्रा काढण्यात आली असे सांगून भारताच्या डीएनए मध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखील सद्भावना असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
तसेच भाजप हा खोके बोके आणि आक्का यांना जन्म देणारा कारखाना असल्याची सणसणीत टीका त्यांनी भाजपवर केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड अशी दोन दिवसांची सदभावना पदयात्रा काढण्यात आली आहे. या रॅलीची सुरुवात संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहून करण्यात आली. तसेच छ्त्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महापुरुषांना अभिवादन करून सद्भावण्याची शपथ घेतल्यानंतर ही यात्रा रवाना झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, प्रा. सुशीला मोराळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, दत्ता बारगजे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांच्यासह संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख मुलगा विराज देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे देखील यात्रेत सहभागी झाले होते.
खा. रजनीताई पाटील काय म्हणाल्या :-संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यातील वातावरण खराब झालेले आहे. ते पूर्वत व्हावे म्हणून ही सदभावना यात्रा काढण्यात आलेली आहे. सर्वांनी एकत्र यावे आणि यात कुठलाही भेदभाव राहू नये. ही आमची भावना आहे. या हत्या संदर्भात बोलताना खा. रजनीताई पाटील म्हणाल्या की, ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यावेळी पोलिसांचा वचक नव्हता. कारण ६ डिसेंबर रोजी जर त्यांनी गुन्हा दाखल करून त्याची दखल घेतली गेली असती. आरोपीवर कारवाई झाली असती तर कदाचित ही घटना देखील घडली नसती. जिल्ह्यातील पंचावन्न टक्के लोक चांगले आहेत. परंतु पाच टक्के दुष्ट प्रवृत्तीमुळे जिल्हा बदना होतोय. जे लोक शक्तीचा, पैशाचा, ताकदीचा आणि राजकारणाचा दुरूपयोग करून सामान्य लोकांना दाबण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याला कायद्याचा धाक बसवायलाच हवा. अशी भावना खा. रजनीताई पाटील यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ज्या विचारांचे आपण पाईक आहोत. ती शुद्ध भावना आमच्या मनात आहे. ही घटना घडल्या पासून देशमुख कुटुंबीयांचा व त्यांच्या कन्येचा बोलताना कुठेही तोल गेलेला नाही. त्यांनी सातत्याने विवेकपूर्ण विचार सर्वां समोर मांडला आहे. विवेकवादी म्हणून ते आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. या परिवाराने सद्भावना जोपासली आहे. त्यांनी कोणत्या धर्माला, कोणत्या जातीला नावे ठेवलेली नाही. त्यामुळे वाईट प्रवृत्ती विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज्यात रोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपला समाज बधीर झालाय का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण साधू संतांचे, महापुरुषांची नावे घेतो. संविधानाचे नाव घेतो, त्यावेळी सर्वांची शिकवण ही सद्भावनाच असल्याचे आपल्या लक्षात येते. या सद्भावण्याच्या विरोधात कोण आहे ? याचा थोडा विचार केल्यास फोडा-तोडा आणि राज्य करा, प्रवृत्ती या विरोधात असल्याचे दिसते. ही प्रवृत्ती आज जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ही ते म्हणाले.
पुढे बोलताना भाजपावर टीका करताना हर्षवर्धन सकपाळ म्हणाले की खोक्या बोके आणि आका यांना जन्म देणारा भाजप हा कारखाना आहे तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले की संतोष देशमुख तपासामध्ये सत्तेचा दुरुपयोग होऊ नये किंवा तपासणी तयार येऊ नये म्हणून त्यांनी राजीनाम देण्याची
गरज होती परंतु तपास संपवून दोषारोपपत्र न्यायालयात सादर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्यामुळे तपास यंत्रणा प्रभावित झाले असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आणि म्हणून त्यांचा राजीनामा हा हास्यस्पद असल्याची कोपरखळी त्यांनी मारली आणि पुढे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकभावना तीव्र झाली होती त्यामुळे कदाचित लोक मंत्रालयात देखील घुसले असते आणि सत्ताधाऱ्यांची पळता पोळी थोडी झाली असती म्हणून त्याच भीतीपोटी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला मुख्यमंत्री यांनी भाग पाडले तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील कृष्णा आंधळे हा फरार असणे म्हणजे सरकारचे अपयशच आहे किंवा त्याला सरकारने पळवून लावण्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच गुन्हेगारांना कुठलेही जात नसते आणि सर्वच लोक नाही वाईट नसतात असे मत देखील त्यांनी केले. केवळ शुद्ध स्वरूपात आमची पदयात्रा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
विजयराज आरकडे

Post Views: 126
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 2
Total Users : 146042
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.