Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिला परितक्त्या महिलेला न्याय !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 9, 2025Updated:March 9, 2025No Comments3 Mins Read

तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिला परितक्त्या महिलेला न्याय ! 

 

गौतम बचुटे/केज :- तारीख-पे-तारीख होत असल्याने वैतागून एका परित्यक्ता महिलेच्या विधवा आईच्या नावावरील शेत जमीन ही नवऱ्याने सवतीच्या मुलाच्या नावे एका बनावट १० रू. किंमतीचे बाँड वरून बनावट बक्षीस-पत्राच्या आधारे केल्याचा फेर रद्द करून तहसीलदार यांनी तात्काळ करून त्या पीडित महिलेला दिलेला शब्द खरा केला आणि ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना आदेश देताच अवघ्या काही तासात त्या महिलेला न्याय मिळवून दिला. या बद्दल तहसीलदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वरपगाव ता. केज येथील दीपा भानासुर देशमुख यांचा विवाह गावातील रवींद्र श्रीहरी भोसले यांच्याशी झाला होता. लग्ना नंतर त्यांना एक कोमल नावाची मुलगी झाली. त्या नंतर रवींद्र भोसले यांनी दुसरा विवाह करीत दीपा देशमुख यांच्या विधवा आई रुक्मिणबाई देशमुख यांच्या नावावरील सर्वे नं. ५६/१ मधील क्षेत्र २६ आर व सर्वे नं. ५७/१ मधील क्षेत्र १ हेक्टर ७४ आर जमीन १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बक्षीस-पत्रा आधारे करून घेतली. रवींद्र भोसले यांनी त्याचा फेरफार (फेरफार क्र. ८०५) करून घेतला होता. त्या नंतर रवींद्र यांनी दुसऱ्या पत्नीचा मुलगा उत्तरेश्वर भोसले याच्या नावे जमीन करून टाकली. यावर दीपा देशमुख यांनी केलेले अपील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी यांनी मंजूर करीत तो फेरफार रद्द करण्याचे आदेश १७ जानेवारी २०२३ रोजी दिले होते.

दरम्यान, या प्रकरणी तहसीलदारांकडे सुनावणी सुरू होती. गुरुवारी दि. ६ मार्च रोजी दुपारी दीपा देशमुख या आपली मुलगी कोमलसह तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे हजर झाल्या आणि आत्ताच फेरफार रद्द करण्याची मागणी करीत बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून घेतले. त्यांनी आत्महदन करण्याचा पवित्रा घेतला. त्या नंतर तहसीलदार राकेश गिड्डे व पोलीस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, नायब तहसीलदार आशा गायकवाड यांनी त्यांची समजूत काढली. हा प्रकार समोर येताच आणि त्याचे अवलोकन केल्या नंतर तहसीलदार राकेश गिड्डे यांनी संबंधित सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदरचा फेरफार तात्काळ आजच्या आज रद्द करण्याचे आदेश दिले. त्या नंतर रात्री सदर महिलेसह त्यांनी त्याची दुरुस्त केलेली ७/१२ देखील सुपूर्त केली.
____________________
आदेशाची झाली तात्काळ अंमलबजाणी :-
तहसीलदारांचे आदेश मिळताच सबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांनी फेर क्र.१७९१ दि. ६ मार्च रोजी.रुक्मिणबाई भ्र. भानासुर देशमुख (मयत) वारस दिपाताई पिता भानासुर देशमुख मा. अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे आदेश क्र.२०१९/सिडी/अपील/कावी/२४० दि.२७/०९/२०२१, मा. सिडी/अपील/कावी/२४० उपविभागीय अधिकारी आबेजोगाई याचे आदेश क्र. २०२१/आरओआर/ओ/१५९ दि. १७/०१/२०२३ अन्वये म.ज.म.अ. १९६६ चे कलम २४६ प्रमाणे आदेश पारीत केला. त्याअनुषंगाने मौजे वरपगाव ता. केज जि. बीड येथील जमीन स.नं. ५६/१ मधील क्षेत्र ०.२६ आर व स.नं. ५७/१ मधील क्षेत्र ०१ हे ७४ आर् नुसार नोंदविलेला मधील फेरफार क्र. ८०५ रद्द करण्यात येत आहे. त्या नुसार रात्री उशिरा ७/१२ वर नोंद घेत उत्तरेश्र्वर भोसले याचा फेर रद्द करून रुक्मीनबाई देशमुख यांच्या नाव ७/१२ देखील तयार करून दिपा देशमुख यांना न्याय मिळवून दिला. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 160
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 2
Total Users : 146042
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.