Author: विजयराज आरकडे

जि.प.मा.शा.भाटुंबा शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश केज – महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा ही अत्यंत प्रतिष्ठित आणि अवघड समजली जाणारी परीक्षा आहे . या परीक्षेत जि. प. मा. शा. भाटुंबा ता.केज शाळेची विद्यार्थिनी कु.प्रणिता नवनाथ गरड हिने शिष्यवृत्तीधारक (इ.८वी) होण्याचा बहुमान पटकावत शाळेची व स्वतःच्या कुटुंबाची मान परिसरात उंचावली आहे. शासकीय क्रीडा विभागातर्फे दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात, यावर्षी प्रथमच सहभागी होणाऱ्या कु.भक्ती किरण धपाटे या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत विजयी होत थेट जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत धडक मारत गावाच्या शीर पेचात यशाचा तुरा रोवला आहे. जि. प. मा. शा. भाटुंबा शाळेचे मुख्याध्यापक श्री.डाॅ. कंचनवार सर व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद यांनी…

Read More

श्याम माध्य.व उच्च माध्य.कला व विज्ञान महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा प्राचार्या.श्री. जयश्री ईप्पर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण  संपन्न केज । प्रतिनिधी वडमाऊली विद्याप्रसारक मंडळ संचलित श्याम माध्य.व उच्च माध्य.कला व विज्ञान महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या बाबत वृत्त असे केज तालुक्यातील दहिफळ (वड ) येथील श्याम माध्य.व उच्च माध्य.कला व विज्ञान महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या.श्री. जयश्री ईप्पर मॅडम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच इंजि. शरद (बप्पा ) गदळे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

Read More

कै.शिवाजीराव पाटील (काका) यांच्या जयंती निमित्ताने वृदांना जिवनउपयोगी साहित्याचे वाटप केज- कै.शिवाजीराव पाटील काका यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ वृध्दाश्रम येथे मा.रणजितसिंह पाटील यांच्या वतीने मा. सादेक फारोकी व डॉ जलाल्लोद्दीन साहेब यांच्या हास्ते फराळाचे व जीवनोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी वृदाश्रमचे संचालक महादेव कराड, दयानंद देशमुख सर, रहाने सर, जाधव सर, चाळक सर, थोरात सर व आश्रमातील वृद स्त्री, पुरुष उपस्थित होते.

Read More

तृतीयपंथी(गार्गी) नर्तिकेचा लॉजवर म्रतदेह आढळला..! केज पोलिस ॲक्शन मोडवर गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील एका कला केंद्रावर काम करीत असलेल्या तृतीय पंथी नर्तिकेचा मस्साजोग येथील लॉजवर गळफास घेउन मृत्यू झाला असल्याचा म्रतदेह आढळला आहे. या बाबतची माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील ओंकार उर्फ गार्गी बबन ढलपे हा तृतीय पंथी बीड मांजरसुंबा रोड वरील सारुळ फाटा रेणुका कला केंद्रावर गायिका व नर्तिका कलाकार म्हणून काम करीत होता. गार्गी हीचा मस्साजोग येथील अजिंक्य हॉटेल अँड लॉजवर दिनांक १६ ऑगस्ट रोजी पहाटे ५:०० वाजता कर्मचाऱ्यांना खोलीत फॅनच्या हुकाला ओढणीने मृतदेह लटकलेला आढळला. लॉजवरील नोकरांनी ही माहिती पोलिसांना दिल्या नंतर पोलीस निरीक्षक…

Read More

केजच्या विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कूलमध्ये ७८ वा.स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..! केज ! प्रतिनिधी विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलमध्ये ७८ वा स्वांतत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात १५ ऑगस्ट रोजी ८ :१५ वाजता शाळेचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य विजयकांत मुंडे व प्राचार्या माधुरीताई मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केज येथिल विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये विद्यार्थ्यांचे पथसंचलन,कविता,गायन,भाषण, सामुहिक नृत्य सादर करण्यात आले.स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले कळंब येथील श्री.डॉ.रमेश जाधवर (बालरोगतज्ञ),श्री.ठाकूर उदयसिंह दिख्खत (विजय कन्स्ट्रक्शन तथा उद्योजक धारूर) श्री.लक्ष्मण शेटे ज्येष्ठ व्यापारी, श्री.ॲड.सुदर्शन…

Read More

केज तालुक्यात काळवीटाची शिकार : वन विभागाने घेतले सहा संशयितांना ताब्यात गौतम बचुटे/केज (बीड) :- काळवीटाची शिकार करून त्याचे मांस व चमड्याची तस्करी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सहा संशयित आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्या रॅकेट मधील आणखी काहीजण हाती लागण्याची शक्यता आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील केकत सारणी येथील शिवारात काळवीट जाळ्यात पकडुन त्याची मान धारदार शस्त्राने कापून शिकार झाल्याची माहिती पोलिसांनी धारूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे यांच्या आदेशाने वन रक्षक वचिष्ट भालेराव, वाहन चालक शाम गायसमुद्रे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक…

Read More

अहिल्यादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक आश्रम शाळा या ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप केज- दिनांक 15/08/2024 आज 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने केज यथील अहिल्यादेवी आश्रम शाळा प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली ताई सांगळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या वाघमारे ताई, हजारे ताई यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री सोन्नर सर, वसंत डि फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री थळकरी सर ,कमल नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या व सर्व स्टाफ उपस्थित होता. अहिल्यादेवी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री सोन्नर सर यांनी विद्यार्थ्यांना…

Read More

माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या स्मृतींचा अजूनही दरवळ…! आज माजी आमदार लोकनेते बाबुराव आडसकर साहेबांचा आठवा स्मृती दिन.आठ वर्षांनंतरही स्मृतींचा दरवळ कायम असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी अनेकांची घरे फुलवली.तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या हाताला रोजगार तर पदवीधरांना नौकरी दिली. केज तालुका म्हटले की स्व.बाबुरावजी आडसकर व त्यांचा “हाबाडा” हे शब्द आठवतात. केज तालुक्याच्या नकाशातील एक छोटेसे गांव म्हणजे आडस.या गांवाला संपुर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख माजी आमदार स्व.बाबुराव आडसकर यांनी मिळवुन दिली . 1964 मध्ये केज पंचायत समितीचे सभापती म्हणुन काम करतांना ग्रामिण प्रश्नांची खरी नस त्यांना सापडली होती.1960 च्या दशकात दळणवळणाची सोय नाही.वृतपञाचा बोलबाला नाही.दुरसंचार माध्यमातुन फोनची सुविधा…

Read More

लोकनेते, कै.माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने उपस्थित राहावे– रमेशराव आडसकर आडस- लोकनेते, कै.माजी आमदार बाबुरावजी आडसकर (तात्या) यांचे आठवे पुण्यस्मरण निमित्ताने बुधवार दि १४/८/२०२४ रोजी केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, वडवणी येथील कार्यकर्ते, स्नेही व आडसकर कुटुंबावर प्रेम करणारे सर्व सन्मानिय, प्रतिष्ठीत नागरिक यांनी आडस येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले आहे. यावेळी सकाळी १० वा ह .भ .प महादेव महाराज बोराडे पावनधाम यांचे किर्तन होईल व भोजन व्यवस्था दुपारी १२ ते ३ श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथे ठेवण्यात आले आहे.

Read More

मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोविंदेश्वर शाळेत शालेय दप्तर वाटप या उपक्रमाचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक नांदेड प्रतिनिधी – गोविंदेश्वर प्राथमिक शाळा तरोडा बु येथे इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. महिला व बालकल्याण जिल्हाधिकारी कैलास तिडके यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले. कैलास तिडके यांनी विद्यार्थी व पालकांना शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती व विविध योजना यांची व्यवस्थित मार्गदर्शन केले व विद्यार्थी कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांचा वाढदिवस व शाळेतील विद्यार्थी साईगणेश…

Read More