केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन केज- प्रतिनिधी केज तालुक्यातील युसुफवडगाव व आडस मंडळ परिसरात दि. 23 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, वीज व्यवस्था तसेच नागरिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच मौजे सोनिजवळा येथील शेतकरी कै. दिगांबर ससाणे यांचा अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.…
Author: विजयराज आरकडे
शिवकालीन युद्धकला व शिवसंस्कार उन्हाळी शिबीर सांगता समारंभ उत्साहात संपन्न; चऱ्होली : नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन, दिघी पुणे-१५ आयोजित शिवकालीन युद्धकला व शिवसंस्कार उन्हाळी शिबीराचा सांगता समारंभ दि. १३ मे २०२६ रोजी सनशाईन SS इंटरनॅशनल स्कूल,चऱ्होली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दि. ४ मे २०२६ ते दि. १३ मे २०२६ या कालावधीत चाललेल्या या १० दिवसीय शिबीरात खेळाडूंना शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ आणि शिवसंस्कारांचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबीर मध्ये तीन दल बनवले तोरणादल, प्रतापगडदल, शिवनेरीदल असे गट तयार करून प्रत्येक दल चे सांगता शेवटी प्रात्यक्षिक करून घेतले.या शिबीर मध्ये महाराष्ट्र मधील प्रसिद्ध असे सह्याद्रीचे भुते ट्रेकर्स चे अध्यक्ष आणि दुर्गशतकवीर…
नियोजित कालावधीत स्व गणना करावी– तहसीलदार अशोक भंडारे केज-(प्रतिनिधी) देशातील १६ वी राष्ट्रीय जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणना (Self Enumeration) करण्यासाठी केज तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांनी योग्य ती कार्यवाही करुन नियोजित कालावधीत स्वगणना करावी, असे निर्देश तहसीलदार अशोक भंडारे यांनी दिले . देशातील १६ वी राष्ट्रीय जनगणना अंतर्गत घर यादी व घरगणना हा पहिला टप्पा १ मे पासून सुरू झालेला आहे. सदर जनगणनेत नागरिकांसाठी स्वगणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वतः ही माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. ही प्रक्रिया सुलभ, वेगवान व वेळेची बचत करणारी असल्याने याबाबत व्यापक…
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडसचा इयत्ता दहावीचा निकाल ९१.६२ टक्के! गुणवत्तेची परंपरा कायम; आडस दि. ८ (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस या शाळेने आपल्या उज्ज्वल यशाची आणि गुणवत्तेची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. यावर्षी शाळेचा एकूण निकाल ९१.६२% इतका शानदार लागला आहे. एकूण प्रविष्ट विद्यार्थी: १८० परीक्षेला अनुपस्थित विद्यार्थी: ०२ उत्तीर्ण विद्यार्थी: १६४ श्रेणीनिहाय विद्यार्थ्यांचे यश शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. विशेष प्राविण्य ३४ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ७७…
केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियात जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा उच्चांक केज दि ६(प्रतिनिधी) केज येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. दर्जेदार उपचार आणि यशस्वी शस्त्रक्रियांच्या जोरावर या रुग्णालयाने संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, सर्वसामान्यांसाठी हे रुग्णालय आता एक मोठा आधारवड ठरत आहे. उपजिल्हा रुग्णालयाने मागील वर्षभरात २११७ शस्त्रक्रिया करून प्रथम क्रमांकावर उच्चांक गाठला आहे. वैद्यकीय अधीक्षक जनरल सर्जन डॉ दत्तात्रेय केंद्रे . स्त्री रोग तज्ञ डॉ केशव इंगोले, शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ चाळक भाऊसाहेब,डॉ स्वाती साखरे , भूलतज्ञ डॉ दिगंबर मुंडे , श्रीमती डॉ पाटील , बालरोग तज्ञ डॉ सावंत बालासाहेब , डॉ निवृत्ती मुंडे, ऑर्थो तज्ञ…
जिद्दीच्या जोरावर प्रविणने मिळवले यश; एमपीएससीत उत्तीर्ण होऊन सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती; तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास बातमी : केज : जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केज येथील उमरी रोड परिसरात राहणाऱ्या प्रविण भारत शिंपले या युवकाने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एमपीएससी ग्रुप क्र. २०२४ अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत त्याची नवी मुंबई येथील सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती झाली आहे. प्रविणचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत होते. आई-वडील शेतमजुरी करून त्याच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते. वेळोवेळी प्रविण ला जवळच्या मित्रांनाही शिक्षणासाठी लागेल ती मदत केली आहे. या कष्टाचे चीज करत प्रविणने आपल्या मेहनतीच्या…
केकतसारणी येथे ७ मे रोजी राष्ट्रचिंतन अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन, कृषी,आरोग्य आणि शिक्षण विषयावर रंगणार चर्चा ; महर्षी गज अरविंदजींची प्रमुख उपस्थिती बहुसंख्येने उपस्थित रहावे- राधाताई सपकाळ केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील केकतसारणी येथे हिंदराष्ट्र ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने ‘राष्ट्र चिंतन अभियान’अंतर्गत येत्या गुरुवारी,७ मे २०२६रोजी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात कृषी,आरोग्य आणि शिक्षण या तीन महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. हे चर्चासत्र केकतसारणी येथील मारुती मंदिर सभागृहात सकाळी ९ ते ११ या वेळेत संपन्न होईल.या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महर्षी गज अरविंदजी उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील नागरिकांना घेता येणार आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रश्नोत्तर…
माध्यमे ही केवळ माहितीचे साधन न राहता, ती लोकशाही मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि सत्यतेच्या आधारावर चालणारी असावीत – सुहास सरदेशमुख केज- युद्धाचे सर्वसामान्य परिणाम अत्यंत विनाशकारी आणि दीर्घकालीन असतात, जे केवळ लढणाऱ्या देशांवरच नाही, तर संपूर्ण जगाला विनाशाच्या दिशेने घेऊन जातात. युद्धामुळे मानवी संस्कृती आणि प्रगती कित्येक वर्षे मागे जाते. दुसऱ्या महायुद्धासाठी जबाबदार असलेला ॲडॉल्फ हिटलर तसेच विन्स्टन चर्चिल हे युद्धाचे वार्ताहर व नंतर सूत्रधार झाले. बदलत्या काळात युद्धासाठी घातक शस्त्र तयार करण्याचे तंत्र विकसित झाले. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वात होरपळणारी व्यक्ती म्हणजे महिला. या परिस्थितीत माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. परंतु सध्याचे चित्र पाहता सध्याचे जर्नालिझम हे हेल्थ नसून ते…
स्व. मंडुबाई दत्तू लोंढे यांचे दिर्घ आजाराने निधन; केज (प्रतिनिधी) – केज शहरातील फुले नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या स्व. मंडुबाई दत्तू लोंढे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या आकाश लोंढे सर व विलास लोंढे सर यांच्या मातोश्री होत्या. दि. २५ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने लोंढे परिवारासह परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळी क्रांती नगर, केज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. मंडुबाई लोंढे यांच्या पश्चात मुले, सुना, मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु.गार्गी गवळी हिची एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड केज/प्रतिनिधी केज येथील माऊली विद्यापीठ अंतर्गत सरस्वती कन्या प्रशालीची विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी हिची एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या निवडीबद्दल कु.गार्गी गवळी सह सरस्वती कन्या प्रशालेच्या सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. २०२५-२६ ची एन.एम.एम.एस. परीक्षा ही दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल हा दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी लागला असून दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. या निवड यादीमध्ये सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी या विद्यार्थिनीची निवड…