Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज येथे शांतता समितीची बैठक सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणारा विरुद्ध कठोर कारवाई करणार — पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ केजचे पावित्र्य आणि सलोखा राखण्यास केजकर समर्थ आहेत — अशोक सोनवणे

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 20, 2026No Comments3 Mins Read

केज येथे शांतता समितीची बैठक

सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणारा विरुद्ध कठोर कारवाई करणार
— पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ

केजचे पावित्र्य आणि सलोखा राखण्यास केजकर समर्थ आहेत — अशोक सोनवणे

गौतम बचुटे, केज:- केज येथील हिंदू आणि मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजासाहब यांच्या उरुसच्या पार्श्वभूमीवर केज येथे शांतताता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी सर्व सण उत्सव आणि जयंत्या या सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकवून साजरे करण्याचे आवाहन केले. तर काही असामाजिक घटक जर सार्वजनिक शांतता आणि कायदा बिघडविण्याचे काम करीत असतील तर पोलिस प्रशासन त्यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलणार असल्याचा इशारा दिला. केजचे पावित्र्य आणि सलोखा राखण्यासाठी केजवासीय समर्थ असून त्यात इतरांची लुडबुड खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा पत्रकार अशोक सोनवणे यांनी दिला.

दि. २० ऑगस्ट रोजी केज येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आणि श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजासाहब यांचा उरुस उत्साहात संपन्न होत आहे. यावेळी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना, पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही असामाजिक घटक आणि समाजकंटक, समाज विरोधी कृत्य करण्यास चिथावणी देऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव व सलोखा
अबाधित राहण्यासाठी प्रयत्न सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना पूजा अर्चा करण्याचा आपल्या संविधानाने अधिकार दिला आहे. तर इतर धर्माचा द्वेष करू नये. तसेच कोणी जर बेकायदेशीररीत्या आणि दहशत निर्माण करून बंद करण्याची व्यापाऱ्यांना सक्ती किंवा दबाव टाकत असेल त्यांच्यावर पोलिस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. त्याच बरोबर पोलिस प्रशासन हे चांगल्या लोकांचा आदर आणि दुर्जन लोकांचा कायदेशीर बंदोबस्त करण्यास समर्थ आहे. शांतताप्रिय लोकांनी तेढ निर्माण करणाऱ्या चुकीच्या पोस्टकिंवा मेसेज यावर तात्काळ रिॲक्ट होऊ नका तसेच अशा पोस्ट व्हायरल करू नका असे आवाहन केले. संविधाना नुसार विविध जाती पंथ गुण्यागोविंदाने नांदत आहोत.
नागरिकांनी एकत्र चांगले काम करू, मदतीसाठी २४ तास तयार आहे.
शांतताप्रिय शहराची ओळख कायम ठेवा असे आवाहन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित शाखेला सूचना दिल्या.

सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले यांनी ख्वाजासाहब यांचा उरुस हा देशमुखांच्या वाड्यातून निघत असल्याने ते हिंदू मुस्लिम एकता आणि सौहार्दाचे प्रतीक असल्याचे नमूद केले.

बैठकीत मार्गदर्शन करताना पत्रकार अशोक सोनवणे यांनी केजचे पावित्र्य, सामाजिक सलोखा व ऐक्य जपण्यास केजकर सदैव तत्पर असून त्यात इतरांनी हस्तक्षेप करू नये असे सांगितले.

व्यापारी संघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांनी अनधिकृत बंदमुळे व्यापारी वर्गांचे होत असलेले आर्थिक नुकसान आणि वाहतूक समस्या यावर लक्ष वेधले.

सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांनी वैक्तिक स्वरूपाच्या मतभेदातून काहीजण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या बाबत दक्षता घेऊन असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

उरुस समितीचे अध्यक्ष खतीब यांनी सर्वांनी उरुसमध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले.
या बैठकीला व्यापारी संघाचे अध्यक्ष
महादेव सूर्यवंशी, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, संतोष गालफाडे, अशोक गायकवाड, लखन हजारे, सतीश डांगे, तालेब इनामदार, अशोक गायकवाड, गौतम बचुटे, तात्या गवळी, रणजीत घाडगे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेतील मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीचे संचलन आणि आभार पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने यांनी व्यक्त केले

विजयराज आरकडे

Post Views: 59
विजयराज आरकडे

Related Posts

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

September 2, 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

September 1, 2026

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;

September 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 0 5 0
Total Users : 149050
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.