Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 1, 2026No Comments3 Mins Read

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

केज दि १(प्रतिनिधी)

शाळा महाविद्यालयीन स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता , मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि डिझाईन थिंकिंग यासारख्या आधुनिक विषयाचा एकात्मिक अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास शैक्षणिक प्रक्रिया पार पाडण्यास अधिकाधिक चांगल्या पद्धतीने मदत होईल याविषयी प्रोफेसर मनसाफ आलम यांनी व्याख्यानातून मत व्यक्त केले. २७ रोजी बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड सामंजस करारा अंतर्गत श्रीमती केशरबाई सोनाजीराव शिरसागर महाविद्यालय, बीड, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव, कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी तालुका परळी , वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा जिल्हा बीड व योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्राचा प्रमुख उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा {AI}अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, सोबतच अध्यापकांनाही नवीन तंत्रज्ञान हस्तगत करून ते वापरण्याचे कौशल्य आत्मसात व्हावे व ते विद्यार्थी हिताकरिता उपयोगात आणले जावे. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख वक्ते प्रोफेसर मनसाफ आलम , कॉम्प्युटर सायन्स विभाग, जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वंकष शिक्षण देण्यासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो हे प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये विशद करून सांगितले. या चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ. राजेश जोशी कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई यांनी विद्यार्थ्यांनी सर्वंकष शैक्षणिक प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध उपयोजनांचा वापर करून आपल्या ज्ञानात भर टाकावी असे सुचविले. राष्ट्रीय चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्रोफेसर नवनाथ काशीद, वनस्पतीशास्त्र विभाग, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय यांनी शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व अध्यापकांना नवीन तंत्रज्ञानाविषयी जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले असे विशद केले. या चर्चासत्रात एकूण 325 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला , ज्यामध्ये मणिपूर, गोवा , ओडीसा, उत्तर प्रदेश, कर्नाटका, दिल्ली, गुजरात व महाराष्ट्र या राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजक प्रोफेसर संतोष तळेकर, प्रोफेसर गणेश पाचकोरे , डॉ शीला शिंदे, डॉ. सारिका संगेकर, श्रीमती अर्चना मुखेडकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. चर्चा सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सारिका संगेकर, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. शंकर सानप, कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी यांनी केले. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वीतेबद्दल श्रीमती अर्चनाताई आडसकर, सचिव, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस, डॉ. अशोक मोहेकर, सचिव, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा जिल्हा धाराशिव, डॉ. शिवाजीराव गुट्टे अध्यक्ष भगवान सेवाभावी संस्था धर्मापुरी. डॉ. योगेश क्षीरसागर सचिव श्री नवगण शिक्षण संस्था नवगण राजुरी व श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

विजयराज आरकडे

Post Views: 13
विजयराज आरकडे

Related Posts

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

September 2, 2026

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;

September 1, 2026

कानडी रोडच्या कामावरून व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी; ‘एक वर्षानंतरही रस्ता समाधानकारक का नाही?’

August 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 0 5 0
Total Users : 149050
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.