Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

कानडी रोडच्या कामावरून व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी; ‘एक वर्षानंतरही रस्ता समाधानकारक का नाही?’

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 31, 2026No Comments2 Mins Read

कानडी रोडच्या कामावरून व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी; ‘एक वर्षानंतरही रस्ता समाधानकारक का नाही?’

केज प्रतिनिधी :
केज शहरातील महत्त्वाच्या कानडी रोडच्या सुरू असलेल्या रस्ता व पुलाच्या कामावरून व्यापारी तसेच वाहनधारक आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरू असूनही अद्याप या रस्त्याची स्थिती समाधानकारक झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे 2012-13 च्या काळात तत्कालीन दिवंगत उपअभियंता सराफ यांच्या कार्यकाळात सी.बी. बिक्कड यांनी कानडी रोडवरील पूल व रस्त्याचे काम केले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या या कामातील पूल सध्याच्या विकासकामासाठी फोडताना विद्यमान कंत्राटदार यश कन्स्ट्रक्शन यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगितले जाते.
मात्र गेल्या सुमारे वर्षभरापासून सुरू असलेल्या कानडी रोड च्या कामाची गती, दर्जा आणि नियोजनाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्यामुळे व्यापारी, पादचारी तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. धूळ, माती, खोदकाम आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘एक वर्ष उलटूनही रस्ता पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा का मिळत नाही?’, असा सवाल आता कानडी रोडवरील व्यापारी व नागरिक उपस्थित करत आहेत. कामाच्या गुणवत्तेवर आणि देखरेखीवर संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, ‘कामामध्ये विलंब होण्यामागे नेमके कारण काय? संबंधित यंत्रणेचे कामावर पुरेसे नियंत्रण आहे का? कामाची गुणवत्ता तपासली जात आहे का?’ असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
काही नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, कोणत्याही व्यक्तीवर भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहाराचा आरोप करण्यापूर्वी त्याबाबत अधिकृत कागदपत्रे व चौकशीचे निष्कर्ष समोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे कामाचा खर्च, मंजूर आराखडा, कामाची मुदत, आतापर्यंत झालेला खर्च आणि गुणवत्ता तपासणीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कानडी रोडचे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक व बाहेर गावातून येणारे विद्यार्थी यांची होत असलेली अडचण सुरळीत करावी आणि निकृष्ट काम आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 237
विजयराज आरकडे

Related Posts

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

September 2, 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

September 1, 2026

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;

September 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 0 5 0
Total Users : 149050
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.