दोन ठिकाणी घरफोडी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविले गौतम बचुटे/केज (बीड ):- केज तालुक्यातील साळेगाव येथे मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाली असून शस्त्राचा धाक दाखवून घरात झोपलेल्या आई व मुलीच्या गळ्यातील दागिने व नगदी रोख रू. ची चोरी करण्यात आली तर अन्य एकाचे घर फोडले आहे. दि. २२ जून रोजी रात्री २:३० वा. च्या सुमारास रत्नमाला काशिनाथ राऊत व त्यांची बाळंत झालेली मुलगी सौ. दिपाली जगदेव व तिचे बाळ झोपलेले असताना घराचा दरवाजा धक्का मारून उघडला. त्यावेळी घरात श्रीमती रत्नमाला काशिनाथ राऊत आणि त्यांची बाळंतीण झालेली मुलगी सौ. दिपाली जगदेव व तिचे बाळ झोपलेले होते. चोरट्यांनी घरात…
Author: विजयराज आरकडे
वसंत प्राथमिक शाळेत जागतिक योगदिन साजरा केज- वसंत प्राथमिक शाळा केज येथे जागतिक योगदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण जगभर व आपल्या देशात हा दिन योगदिन म्हणून पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर वसंत प्राथमिक शाळेत विद्यार्थी यांना योग विषयी सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख यांनी देत अनेक योगासने विद्यार्थी यांच्याकडून करून घेतले. यावेळी शाळेचे सह शि. अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, बालवाडी शिक्षिका हजारे मॅडम, बनसोडे मॅडम यांनीही योग अभ्यासात सहभाग घेतला.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. रजनीताई पाटील यांच्यावर आता तीन राज्याची जबाबदारी ! (काँग्रेस शोधणार पराभवाची कारणे) —————————— केज दि २०(प्रतिनिधी) काँग्रेसच्या खासदार तथा ज्येष्ठ नेत्या खा.रजनीताई अशोकराव पाटील यांच्यावर पक्षाने पुन्हा एक मोठी जबाबदारी दिली असून रजनीताई यांचेकडे आता तीन राज्यांची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाने प्रसिद्ध केलेल्या या यादीनुसार त्यांचेवर इतरांपेक्षा मोठी अर्थात तीन राज्यांची जबाबदारी असणाऱ्या त्या एकमेव नेत्या आहेत. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा व पक्षातील एक विश्वासू नेत्या म्हणून नेहमीच त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने सोपवलेली आहे व ताईंनी देखील तेवढ्याच जबाबदारीने पक्षाचे काम केलेले आहे. यावेळी त्यांच्याकडे दिल्ली, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या तीन राज्याच्या लोकसभा निवडणुकीत…
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथे प्रवेश उत्सव साजरा आडस- श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडस या ठिकाणी प्रवेशोत्सव कार्यक्रमाअंतर्गत दि. 15 जून 2024 या रोजी नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे फुल देऊन व चॉकलेट वाटप करून उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेश देशमुख सर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्ता अंबाड सर, उपमुख्याध्यापक श्री. श्रीकिशन आकुसकर सर, पर्यवेक्षक श्री. मिटू लाखे सर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. प्रमोद बिडवई सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वसंत प्राथमिक शाळेत प्रवेश उत्सव साजरा _——————————- वसंत प्राथमिक शाळा केज येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ इयत्ता पहिलीसाठी नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी यांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पालक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख सर, किरण अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर बालवाडी शिक्षिका हजारे मॅडम हे उपस्थित होते. वकीलवाडी, हनुमान मंदिरा शेजारी असणाऱ्या वसंत प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत से. मी. माध्यम साठी प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण, विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर, विविध सांस्कृतिक स्पर्धा व क्रिडा स्पर्धेचे आयोजन हे या शाळेचे प्रमुख…
मुल आणि पालक यांच्यातील सुसंवाद गरजेचा – मिताली लाठी अंबाजोगाई (प्रतीनिधी) :मुल आणि पालक यांच्यामध्ये केवळ संवाद गरजेचा नसुन सुसंवाद गरजेचा आहे. सोशल मीडियाच्या या काळात पालक आणि मुलांनी मोबाइलचा वापर आवश्यकतेपुरताच करावा. मोबाइल अडिक्शनचे परिणाम व्यसनाधीनतेपेक्षाही घातक असल्याने सोशल मीडियाच्या अधीन आजची मुले जावून त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच सोबत त्यांचा पालकांसोबतचा सुसंवाद खुंटत चालला आहे असे प्रतिपादन मिताली लाठी यांनी अंबाजोगाई येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित मिले सुर मेरा तुम्हारा या कार्यक्रमात केले. याबाबत सविस्तर असे की, महेश नवमी निमित्त अंबाजोगाई तालुका माहेश्वरी समाजाच्या वतीने मिले सुर मेरा तुम्हारा हा कार्यक्रम येथील विलासराव देशमुख सभागृहात दि. १३…
ट्रॅक्टरचा अपघात नसून घातपात असल्याचा मयत धीरज कसबे यांच्या आईचा संशय सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मयताच्या आईची मागणी गौतम बचुटे/केज (बीड) :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिघोळअंबा शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या झालेल्या अपघातात धिरज कसबे याचा मृत्यू हा अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय धिरजच्या विधवा आईने व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. या बाबतची माहिती अशी की, धिरज प्रभाकर कसबे रा. वरपगाव ता आंबेजोगाई येथील सुरेश व्यंकटी जाधव यांच्या ट्रॅक्टर काम करीत होता. दि. २६ एप्रिल २०२४ रोजी धिरज कसबे हा डिघोळआंबा शिवारातील सुदाम गणपत सोनवणे यांच्या शेतात ट्रॅक्टरने गाळ…
केज शहरात इमर्जन्सी (तातडीचे) रक्तदान शिबीरात 16 रक्तदात्यांचे उस्फुर्त रक्तदान आई व मुलीने केले रक्तदान केज: अंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा झालेला असल्याने तेथील रक्त पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ब्लड बँकेच्या विनंतीवरून रोटरी क्लब ऑफ केज, रामकृष्ण परमहंस परिवार केज व संस्कार प्रतिष्ठान केज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि 12 जून रोजी हनुमान मंदिर वकिलवाडी केज येथे सकाळी 10-30 वाजता इमर्जन्सी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. आंबेजोगाईच्या ब्लड बँकेवर केज तालुक्यातील रुग्ण अवलंबून आहेत. एरवी दिनविशेष व महापुरुष आणि राजकीय नेते व इतर लोकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. अशा वेळी सामाजिक निष्ठेपेक्षा व्यक्ती निष्ठा किंवा भावना बाळगून…
आणखी एक आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण पोलिसांनी ताब्यात घेतला *आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी* गौतम बचुटे/केज :-सोशल मीडियावर सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरुद्ध केज पोलिसांनी कठोर पावले उचलले आहेत. पोलिसांनी आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोशल मीडियावर सामाजिक शांतता आणि कायदा संस्थेला बाजार आणणाऱ्या तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट विविध समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या इसमा विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाईचे पावले चालली आहेत. मागील काही दिवसात केज तालुक्यात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी अशा अनेक समोर कारवाया करून त्यांना कायद्याचा बडगा दाखविला आहे. दरम्यान अशाच…
सरकारने शब्द देऊनही परशुराम आर्थिक विकास महामंडळ झाले नाही , १५ आॕगष्ट पासून पुन्हा उपोषण करावे लागणार – धनंजय कुलकर्णी केज समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मागील अनेक वर्षापासून परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी आंदोलन करत आहे १४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा करूनही मागील सहा महिन्यात साध परशुराम आर्थिक विकास महामंडळ करु न शकणाऱ्या सरकारला ब्राह्मण समाजासाठी काही देण्याची इच्छा नाही असे दिसते त्यामुळे १५ आॕगष्ट च्या आत जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी ५०० कोटीचा निधी देऊन कार्यरत झाले नाही तर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पुन्हा आमरण उपोषण करेल व…