Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज शहरात इमर्जन्सी (तातडीचे) रक्तदान शिबीरात 16 रक्तदात्यांचे उस्फुर्त रक्तदान आई व मुलीने केले रक्तदान

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 13, 2024Updated:June 13, 2024No Comments2 Mins Read

केज शहरात इमर्जन्सी (तातडीचे) रक्तदान शिबीरात 16 रक्तदात्यांचे उस्फुर्त रक्तदान

आई व मुलीने केले रक्तदान

केज: अंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा झालेला असल्याने तेथील रक्त पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ब्लड बँकेच्या विनंतीवरून रोटरी क्लब ऑफ केज, रामकृष्ण परमहंस परिवार केज व संस्कार प्रतिष्ठान केज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि 12 जून रोजी हनुमान मंदिर वकिलवाडी केज येथे सकाळी 10-30 वाजता इमर्जन्सी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. आंबेजोगाईच्या ब्लड बँकेवर केज तालुक्यातील रुग्ण अवलंबून आहेत. एरवी दिनविशेष व महापुरुष आणि राजकीय नेते व इतर लोकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. अशा वेळी सामाजिक निष्ठेपेक्षा व्यक्ती निष्ठा किंवा भावना बाळगून मोठया प्रमाणात रक्तदान केले जाते. याउलट जेंव्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासतो तेंव्हा कोणीच पुढे येत नाही. रोटरी क्लब ऑफ केज, रामकृष्ण परमहंस परिवार व संस्कार प्रतिष्ठान केज यांनी यापुढे जेंव्हा रक्ताचा तुटवडा भासेल अशा वेळीच इमर्जन्सी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्धार केला आहे.
सध्या अंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताची कमतरता भासत असल्याने रक्तपेढीच्या विनंतीवरून केज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
केवळ एका हाकेवर दीड तासात शहरातील 16 समाजप्रेमी रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये
सोमनाथ किशोर शेटे,
प्रथमेश महेंद्र शेटे,
गीता जीवराज अंडील,
नरेश हनुमंत बोर्डे,
विवेक विक्रमराव देशमुख,
उदय बबनराव कुंभकर्ण,
शिवाजी अशोक औसेकर,
प्रतीकराजे हनुमंत भोसले,
अनिकेत अनंतराव देशमुख,
शेख लियाकत उस्मान,
शुभम सचिन अंधारे,
भाग्यश्री प्रवीण पैठणकर (आई),
मृण्मयी प्रवीण पैठणकर (मुलगी),
प्रकाश सदाशिव उंबरकर,
गौतम सुरेश मोरे,
संतोष रामभाऊ लोंढे या रक्तदात्यांचे समावेश आहे. यावेळी महिला रक्तदात्यांचा विशेष उत्साह होता. गीता जीवराज अंडील यांनी इतरांना प्रेरित करत रक्तदान केले तर भाग्यश्री प्रवीण पैठणकर व मृण्मयी प्रवीण पैठणकर या मायलेकींनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
वरील सर्व रक्तदात्यांचे ज्यांना यांचे रक्त दिले जाणार आहे अशा सर्व गरजू रुग्णांच्या वतीने व केजवासीयांच्या वतीने प्रोजेक्ट चेअरमन हनुमंत भोसले यांनी आभार व्यक्त केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी केज रोटरीचे पुढील वर्षाचे अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद, प्रवीण देशपांडे, अरुण अंजान, दादा जमाले तर रामकृष्ण परमहंस परिवाराचे शिवाजी औसेकर, उदय कुंभकर्ण, लोंढे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

विजयराज आरकडे

Post Views: 56
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.