सरकारने शब्द देऊनही परशुराम आर्थिक विकास महामंडळ झाले नाही , १५ आॕगष्ट पासून पुन्हा उपोषण करावे लागणार – धनंजय कुलकर्णी
केज
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मागील अनेक वर्षापासून परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी आंदोलन करत आहे १४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा करूनही मागील सहा महिन्यात साध परशुराम आर्थिक विकास महामंडळ करु न शकणाऱ्या सरकारला ब्राह्मण समाजासाठी काही देण्याची इच्छा नाही असे दिसते त्यामुळे १५ आॕगष्ट च्या आत जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी ५०० कोटीचा निधी देऊन कार्यरत झाले नाही तर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पुन्हा आमरण उपोषण करेल व यावेळी महामंडळ कार्यरत झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही.
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे यामधे १ सप्टेंबर २०१८ चे केज तहसीलसमोर धरणे , २८ आक्टोबर २०१८ रोजी केज ते बीड मोटार सायकल मोर्चा , २२ जानेवारी २०१९ चे आझाद मैदानावर धरणे आंदोलन यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील काही केले नाही , त्यानंतर ३ आॕगष्ट २०१९ ला औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन , त्यानंतर २२ जानेवारी २०२० रोजी बीड कलेक्टर आॕफीस समोर धरणे आंदोलन , त्यानंतर केज , बीड जिल्हा व मराठवाडा मधे अनेक ठिकाणी पळी ताम्हण वाजवून आंदोलन त्यानंतर सातत्याने अनेक ठिकाणी आंदोलन झाली , अंबाजोगाई येथील बैठकीत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी जालना चमन येथे आमरण उपोषण केले इतर मागास विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेतले व दि १४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील अधिवेशनात समस्त ब्राम्हण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा सोबत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , मंत्री अतुलजी सावे , छगनरावजी भुजबळ ,संदिपान भुमरे , संजय राठोड यांच्या सह सर्व विभागाचे सचीव यांच्या उपस्थिती मधे मुख्यमंत्री महोदयानी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा केली त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी इतिवृत्त तयार झाले यामधे ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास तरुण असा उल्लेख करून इतिवृत्त तयार वास्तविक पाहता ब्राह्मण समाजातील गरजू ना लाभ मिळायला हवा परंतु तरुण आर्थिकदृष्ट्या मागास या शब्दाचा वापर करून शब्दछल करत इतिवृत्त बनवले यावर संघर्ष समितीने हे दुरुस्त करून लवकर प्रस्ताव तयार करावा अशी मागणी केली परंतु त्यानंतर सरकारने संघर्ष समितीच्या व ब्राह्मण समाजाच्या मागणी अजिबात लक्ष दिले नाही अजूनही परशुराम आर्थिक विकास महामंडळ तयार झाले नाही याचा अर्थ ब्राह्मण समाजाच्या मागणी कडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता दिसत आहे तरी १५ आॕगष्ट पर्यत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५०० कोटी चा निधी तात्काळ देऊन महामंडळ कार्यान्वित करावे अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती १५ आगष्ट पासून आमरण उपोषण करेल असे संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक धनंजय कुलकर्णी केज , दिपक रणनवरे जालना , श्रीकांत जोशी अकोला , ईश्वर दिक्षीत मलकापुर बुलढाणा , विजयाताई कुलकर्णी छत्रपती संभाजी नगर , ॲड राजेंद्र पोतदार वसमत , स्वप्नील केळकर डोंबिवली , अशोक वाघ जळगाव , उदय जोशी नंदुरबार , ॲड भानुदास शौचे नाशिक , शाम कुलकर्णी गंगाखेड , संतोष कुलकर्णी नांदेड , योगेश जानतीकर लातुर , ॲड प्रज्ञा भिडे दादर मुंबई , अतुल घोडके , विजय दिवाण बार्शी , अनिल दिक्षीत धुळे , भीमाशंकर कुलकर्णी औसा महेश अकोलकर अंबाजोगाई , मकरंद कुलकर्णी अंबाजोगाई , विनायक रत्नपारखी माजलगाव , दत्ता महाजन माजलगाव , दिगंबर जोशी वडवणी , योगेश जोशी चिंचाळा , डॉ राजेंद्र चौधरी पाथरी , प्रवीण जोशी पाथरी , विजय देशपांडे नगर , गणेश लंके पंढरपूर , विजय जोशी पाटोदा , व्यंकटेश जोशी धाराशीव , अविनाश कुलकर्णी आकुर्डी पुणे , दिपाली देशपांडे पुणे , विकास वाघ धाराशीव , किशोर कुलकर्णी साक्री , किशोर कुलकर्णी मोहोळ सोलापूर , जयंत देव वाशीम , लिना दापोलीकर रत्नागिरी यांनी सांगितले याबाबतीत केज तहसील कार्यालयात ना. त. आशा वाघ यांना निवेदन देण्यात आले यावेळी धनंजय कुलकर्णी , श्रीनिवास केजकर , श्रीधर खोत , व्यंकटेश महाजन उपस्थित होते
