Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

ट्रॅक्टरचा अपघात नसून घातपात असल्याचा मयत धीरज कसबे यांच्या आईचा संशय सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मयताच्या आईची मागणी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 13, 2024No Comments2 Mins Read

ट्रॅक्टरचा अपघात नसून घातपात असल्याचा मयत धीरज कसबे यांच्या आईचा संशय

सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मयताच्या आईची मागणी

गौतम बचुटे/केज (बीड) :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिघोळअंबा शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या झालेल्या अपघातात धिरज कसबे याचा मृत्यू हा अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय धिरजच्या विधवा आईने व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, धिरज प्रभाकर कसबे रा. वरपगाव ता आंबेजोगाई येथील सुरेश व्यंकटी जाधव यांच्या ट्रॅक्टर काम करीत होता. दि. २६ एप्रिल २०२४ रोजी धिरज कसबे हा डिघोळआंबा शिवारातील सुदाम गणपत सोनवणे यांच्या शेतात ट्रॅक्टरने गाळ टाकण्याचे काम करीत असताना ट्रॅक्टर पलटी होवून त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्या बाबत युसूफवडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान मयत धिरज कसबे याची आई शिला कसबे यांनी मा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक बीड यांना एक निवेदन दिले असून त्यांनी म्हंटले आहे की, माझा मुलगा धिरज कसबे याचा मृत्यू हा अपघातात झालेला नसून त्याचा घातपात करून त्याचा खून केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यांनी तक्रारी म्हंटले आहे की, त्यांचा मुलगा धिरज कसबे याला दडपण टाकून बळजबरीने सुरेश जाधव हे त्याच्याकडून ट्रॅक्टर चालविण्याचे काम करून घेत होते. तसेच त्याच्याकडून ज्या ट्रॅक्टरने काम करून घेतले जात होते ते ट्रॅक्टर अत्यंत जुने आणि भंगार असलेले ट्रॅक्टर ते चालविण्यास अपात्र असताना देखील तो अनुसूचित जातीचा असल्याची माहिती असताना त्याला धमकी देवून त्याच्या कडून काम करवून घेत असत. तसेच त्याने कामाचे पैसे मागितल्यास देत नसत. त्याच्यावर ते मानसिक दडपण टाकीत होते. धिरजचा मृत्यू झाल्या नंतर त्याच्या आईला किंवा जवळच्या नातेवाईकांना त्याची कल्पना न देता त्यांचे ज्यांच्याशी पूर्वीपासून भांडण सुरू आहे त्या भावकितील नवनाथ विठ्ठल कसबे याला हाताशी धरून खोटा पंचनामा तयार केला. आणि अपघातातील जुने भंगारातील ट्रॅक्टर बदलून नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याचे नोंद करण्यात आली आहे.
मयत धिरज कसबे याची आई शीला कसबे यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या मुलगा धिरज कसबे याचा अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केली. म्हणून त्यांना ट्रॅक्टर मालक सुरेश जाधव यांचा दबाव येत आहे. त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला किंवा काही त्यांचे जावाई, मुलगी यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास पोलीस प्रशासन व ट्रॅक्टर मालक सुरेश व्यंकटी जाधव, तानबा बाबुराव लांडगे, सुदाम गणपत सोनवणे व खोटा जवाब देणारा नवनाथ विठ्ठल कसबे हे जबाबदार राहतील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 41
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 3
Total Users : 146033
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.