वसंत प्राथमिक शाळेत जागतिक योगदिन साजरा
केज-


वसंत प्राथमिक शाळा केज येथे जागतिक योगदिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
२१ जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण जगभर व आपल्या देशात हा दिन योगदिन म्हणून पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर वसंत प्राथमिक शाळेत विद्यार्थी यांना योग विषयी सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख यांनी देत अनेक योगासने विद्यार्थी यांच्याकडून करून घेतले.
यावेळी शाळेचे सह शि. अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, बालवाडी शिक्षिका हजारे मॅडम, बनसोडे मॅडम यांनीही योग अभ्यासात सहभाग घेतला.
