Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मुल आणि पालक यांच्यातील सुसंवाद गरजेचा – मिताली लाठी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 14, 2024No Comments2 Mins Read

मुल आणि पालक यांच्यातील सुसंवाद गरजेचा – मिताली लाठी

अंबाजोगाई (प्रतीनिधी) :मुल आणि पालक यांच्यामध्ये केवळ संवाद गरजेचा नसुन सुसंवाद गरजेचा आहे. सोशल मीडियाच्या या काळात पालक आणि मुलांनी मोबाइलचा वापर आवश्यकतेपुरताच करावा. मोबाइल अडिक्शनचे परिणाम व्यसनाधीनतेपेक्षाही घातक असल्याने सोशल मीडियाच्या अधीन आजची मुले जावून त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच सोबत त्यांचा पालकांसोबतचा सुसंवाद खुंटत चालला आहे असे प्रतिपादन मिताली लाठी यांनी अंबाजोगाई येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित मिले सुर मेरा तुम्हारा या कार्यक्रमात केले.
याबाबत सविस्तर असे की, महेश नवमी निमित्त अंबाजोगाई तालुका माहेश्वरी समाजाच्या वतीने मिले सुर मेरा तुम्हारा हा कार्यक्रम येथील विलासराव देशमुख सभागृहात दि. १३ जुन रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मिताली लाठी म्हणाल्या की, आजकाल सोशल मीडियाचा बोलबाला असल्याने प्रत्येक जण सोशल मीडियावर व्यस्त आहे. यामुळे मुल आणि पालक यांच्यातील संवाद खुंटत चालल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकजण स्क्रीन अडिक्शनचे बळी पडत आहेत. यामुळे मुलांसोबत पालकांनी सुद्धा मोबाइलचा वापर कमी करुन आपल्या मुलांसोबत सुसंवाद साधावा. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर सार्वजनिक करु नयेत. आठवड्यातून एक दिवस मोबाइल पूर्णपणे वर्ज्य करावा. कुटुंबातील सुसंवाद हाच अनेक कौटुंबिक समस्यांवरील उपाय आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहेश्वरी समाजाचे जिल्हा सचिव जगदीश जाजू यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपा धुत यांनी तर आभार प्रदर्शन नेतल थुत यांनी केले. यावेळी माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीकृष्ण तोष्णीवाल, जिल्हा सचिव सतीश तोष्णीवाल, जिल्हा महिला अध्यक्ष पुनम जाजु, तालुकाध्यक्ष दत्तप्रसाद लोहिया, तालुका महिला अध्यक्ष शिवकन्या रांदड व माहेश्वरी समाजातील शालेय मुले व पालक मोठय़ा संख्येने हजर होते.

विजयराज आरकडे

Post Views: 51
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.