Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

दोन ठिकाणी घरफोडी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविले

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 22, 2024No Comments2 Mins Read

दोन ठिकाणी घरफोडी

धारदार शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविले

गौतम बचुटे/केज (बीड ):- केज तालुक्यातील साळेगाव येथे मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाली असून शस्त्राचा धाक दाखवून घरात झोपलेल्या आई व मुलीच्या गळ्यातील दागिने व नगदी रोख रू. ची चोरी करण्यात आली तर अन्य एकाचे घर फोडले आहे.

दि. २२ जून रोजी रात्री २:३० वा. च्या सुमारास रत्नमाला काशिनाथ राऊत व त्यांची बाळंत झालेली मुलगी सौ. दिपाली जगदेव व तिचे बाळ झोपलेले असताना घराचा दरवाजा धक्का मारून उघडला. त्यावेळी घरात श्रीमती रत्नमाला काशिनाथ राऊत आणि त्यांची बाळंतीण झालेली मुलगी सौ. दिपाली जगदेव व तिचे बाळ झोपलेले होते. चोरट्यांनी घरात प्रवेश केल्या नंतर श्रीमती रत्नमाला राऊत आणि सौ. दिपाली जगदेव यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविला. तसेच रत्नमाला राऊत हिच्यावर शस्त्राचा वार केला. यात रत्नमाला राऊत ही जखमी झाली असून त्यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर पाच टाके पडले आहेत. तर त्यांची मुलगी सौ. दिपाली जगदेव हिला खरचटले आहे. चोरट्यांनी दोघींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व पर्स मधील नगदी चार हजार रु. व एक मोबाईल चोरून नेला. तसेच घरा जवळच्या शेतात पर्स टाकून पळून गेले. चोरी करीत असताना चोरट्यांनी शेजारी राहत असलेले अनिरुद्ध बचुटे यांच्या घराला बाहेरून कडी लावली.
याच दरम्यान चोरट्यांनी मन्मथ मेडकर यांच्या घराचा दरवाजाचा कोंडा कापून आत प्रवेश केला आणि घरातील कपाट, कपडे व धान्याचे पोटे व स्वयंपाक घरात धुंडाळा घेतला. मन्मथ मेडकर यांच्या घरातील कपाटात ठेवलेले नगदी दहा हजार रु चोरून नेले. दरम्यान यावेळी मन्मथ मेडकर आणि त्यांची पत्नी हे पुणे येथे मुला कडे गेले असल्याने त्यांच्या घरी कोणी नव्हते.

चोरीची माहिती मिळताच पोलिसांच्या रात्रगस्ती पथकावरील पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार श्रीकांत चौधरी, पोलीस नाईक प्रकाश मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस जमादार बाबासाहेब बांगर आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 62
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.