स्व. मंडुबाई दत्तू लोंढे यांचे दिर्घ आजाराने निधन; केज (प्रतिनिधी) – केज शहरातील फुले नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या स्व. मंडुबाई दत्तू लोंढे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या आकाश लोंढे सर व विलास लोंढे सर यांच्या मातोश्री होत्या. दि. २५ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने लोंढे परिवारासह परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळी क्रांती नगर, केज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. मंडुबाई लोंढे यांच्या पश्चात मुले, सुना, मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Author: विजयराज आरकडे
सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु.गार्गी गवळी हिची एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड केज/प्रतिनिधी केज येथील माऊली विद्यापीठ अंतर्गत सरस्वती कन्या प्रशालीची विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी हिची एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या निवडीबद्दल कु.गार्गी गवळी सह सरस्वती कन्या प्रशालेच्या सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. २०२५-२६ ची एन.एम.एम.एस. परीक्षा ही दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल हा दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी लागला असून दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. या निवड यादीमध्ये सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी या विद्यार्थिनीची निवड…
कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात; केज- केज शहरातील कानडी रोडचे काम नगरोथ्थान योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले असले तरी या कामात अनेक गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. विशेषतः प्रशांत नगर परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या नाल्यावर कोणताही संरक्षणात्मक कठडा बांधण्यात आलेला नाही. यामुळे नागरिक, पादचारी तसेच वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर जवळच मोठी शाळा असून सतत रहदारी असते. पुढे अनेक गावांकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथे दिवसभर वर्दळ असते. मात्र नाल्यावर कठडा नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी…
संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न; केज (प्रतिनिधी) : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संविधान एकता युवा मंच, केज यांच्या वतीने निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये डॉ. आंबेडकर यांचे कार्य, विचार व देशासाठीचे योगदान याबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावीपणे उभे केले, तर चित्रकला स्पर्धेतून त्यांच्या जीवनकार्याचे सुंदर चित्रण साकारण्यात आले. या स्पर्धांमध्ये केज शहरातील वसंत माध्यमिक विद्यालय, जय भवानी कन्या प्रशाला तसेच वसंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.…
*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन* केज: केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. एका कार्यक्षम आणि…
संविधान एकता युवा मंच तर्फे केजमध्ये भव्य भिम जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन; ________________________________________ पहाट परिवर्तनाची भिमगितांचा बहारदार कार्यक्रम; आवाज आपल्या कलाकारांचा सुरेल संगीत गीतांचा नजराणा, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व स्पर्धां, सांस्कृतिक कार्यक्रम, वस्तीगृह निवासी विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप, व्याख्यान व स्नेेह भोजन; ________________________________________ बातमी : केज : संविधान एकता युवा मंच, कानडी रोड केज यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय प्राथमिक व माध्यमिक गटासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, तसेच गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच…
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध –खा.रजनीताई पाटील आनेगाव शिवारात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ केज – सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. शाश्वत विकासासाठी असे प्रकल्प उभारले पाहिजेत असे मत खा.रजनीताई पाटील यांनी केले त्या आनेगाव शिवारातील केज सोलार प्रायव्हेट लिमिटेड २ मॅगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती माजी मंत्री अशोकराव पाटील,माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील,गंगा माऊली साखर कारखान्याचे चेअरमन हनुमंत मोरे, पाटील,युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, युसुफवडगाव महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री हलकुडे,गंगा माऊली उद्योग समूहाचे प्रवीण मोरे,काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, आदित्य ग्रीन…
केज उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान केज – केज शहरालगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात महिन्यातील पहिला शनिवार या स्वच्छता अभियान मोहीम अंतर्गत परिसराची स्वच्छता करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानात मेट्रन श्रीमती पळशीकर, श्रीकृष्ण नागरगोजे , श्रीमती गवळी, श्रीमती जोगदंड ,श्रीमती भोपळे, श्रीमती साळवे, श्रीमती चव्हाण, श्रीमती गायकवाड, श्रीमती घुले, श्रीमती गिरी, श्रीमती पौळ,श्रीमती कराड,श्रीमती किवटे, श्रीमती सोनवणे,नासेर अली,श्री माळी,यांच्यासह आरोग्य कर्मचारी सहभाग नोंदवून रुग्णालय परिसर व उद्यान स्वच्छ केले. तेथील कचरा एकत्रित करून कचरा व्यवस्थापन करण्यात आले.राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामुळे परिसर स्वच्छ व सुंदर झाला.
ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल व देविदास जोगदंड यांचा स्तुत्य उपक्रम; केज!! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील रमेशराव आडसकर यांचे कट्टर समर्थक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल व देविदास जोगदंड यांनी स्वखर्चाने गावातील नागरिकांसाठी मोफत टॅंकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की सोनिजवळा येथे गेल्या 30 वर्षांपासून धनेगाव पाणी पुरवठा करणारी योजना सुरू होती परंतु त्या योजनेला बराचसा कालावधी झाल्याने ती पाइपलाइन जिर्ण झाली आहे त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. शासनाने जलजिवन मिशन योजने अंतर्गत जवळबंन येथील जलकुंभातुन सोनिजवळा गावांसाठी 4 कोटी 13 लाख रुपये किंमतीची योजना 2023 मध्ये मंजूर करण्यात आली होती व त्यां…