*नमिताताई मुंदडा यांना पुन्हा एकदा निवडून द्या केज मतदारसंघ दत्तक मी घेते..! पंकजाताई मुंडे अंबाजोगाई- महायुतीच्या उमेदवार नमिताताई अक्षय मुंदडा यांना पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून द्या केज मतदारसंघात विकासगंगा आणून इथला सर्वांगीण विकासासाठी हा मतदारसंघ मी दत्तक घेऊन येणाऱ्या काळात एकदिलाने आपण काम करू असे मत माजी मंत्री, पंकजाताई मुंडे यांनी काल अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केले. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार प्रितमताई मुंडे व जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, नमिताताई मुंदडा या मि दिलेल्या उमेदवार आहेत. त्यांना…
Author: विजयराज आरकडे
शरदचंद्र पवार साहेबांचे निष्ठावंत जेष्ठ नेते मनोहर डाके रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठी मैदानात माजलगाव- राशप चे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून माजलगाव मतदारसंघात ओळख असणारे मनोहरजी डाके यांनी रमेशराव आडसकर यांना विजयी करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे यामुळे रमेशराव आडसकर यांच्या बद्दल मतदारसंघात सहानुभूती असल्याचे स्पष्ट होत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मनोहरजी डाके यांनी बोलताना सांगितले की, राशप कडून रमेशराव आडसकर यांना उमेदवारी देण्याचे या ठिकाणी शब्द दिला गेला होता परंतु ऐनवेळी त्यांना डावलले ते मतदारसंघात कार्यकर्ते यांना पटलेले नाही. त्यामुळे आम्ही पुर्ण ताकदीने रमेशराव आडसकर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र झटणार आहोत.…
यंदा हाबाडा देण्यासाठी माजलगाव मतदारसंघात स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनी आवळली वज्रमुठ ; रमेशराव आडसकर यांची विश्वासार्हता मतदारात पसरली माजलगाव- माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर हे अपक्ष उमेदवार म्हणून गॅस शेगडी या चिन्हावर लढत आहेत. यंदा हाबाडा देण्यासाठी मतदारसंघातील सर्वच समाजातील स्थानिक नेते,कार्यकर्ते यांनी वज्रमुठ आवळली असून मतदारसंघात रमेशराव आडसकर यांच्याबद्दल मतदारात विश्वासार्हता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांना ते आपला उमेदवार असल्याचे जाणवू लागले आहेत. माजलगाव, धारूर, वडवणी येथील शहर व गावागावातील नेते मंडळी, कार्यकर्ते, पुरुष, महीला, तरूण मतदार, रमेशराव आडसकर , त्यांच्या पत्नी अर्चनाताई आडसकर, रूषीभैय्या आडसकर, शशी भैय्या आडसकर, रंजितदादा आडसकर यांचे स्वागत करून प्रचारात सहभागी होत आहेत. रमेशराव आडसकर…
केज मतदारसंघात निधीच्या नावाखाली शेंडी लावायचे धंदे : पृथ्वीराज साठेंच्या विजयावर शिक्कामोर्तब करा..! जयंत पाटील (महाविआ, प्रदेश अध्यक्ष) केज! प्रतिनिधी महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्र पिछाडीवर नेण्याचे काम केले असून निवडणुकीच्या तोंडावर नुसती घोषणाबाजी सुरु केली आहे. केज मतदारसंघातही शेकडो कोटींच्या निधींची वल्गना करण्यात येत आहे. हे फक्त शेंडी लावायचे धंदे असून मतदारांनी यांच्या भूलथापांना बळी पडू नये. केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पृथ्वीराज साठे या गरीब आणि साध्या माणसाला उमेदवारी दिली असून साठे जरी गरीब असले तरी मनाने मात्र श्रीमंत आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज साठेंचा विजय निश्चित असून येणाऱ्या 20 तारखेला तुतारी चिन्हावर मतदान करुन विजयावर शिक्कामोर्तब करावे, असे आवाहन…
*नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , पंकजा मुंडे यांची जाहीर सभा* प्रतिनिधी- भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अंबेजोगाई येथे मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबरला सकाळी 11=30 वाजता श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह येथे देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री ना. नितीन गडकरी , भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे. केज विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. तरी या सभेसाठी भाजपा…
*केज शहरात दिव्यांग मतदार जनजागृती रॅली संपन्न…* केज/प्रतिनिधी—- आज केज विधानसभा मतदारसंघ 232 (अ.जा.) सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिव्यांग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.यावेळी रॅलीचा शुभारंभ तहसिल कार्यालय केज येथून तहसिलदार मा.गिड्डे साहेब, तहसिलदार मा.तरंगे साहेब,पंचायत समिती बी.डी.ओ.दिवाणे मॅडम,मा.तालुका गटशिक्षण अधिकारी मा.बेडसकर साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या रॅलीचे आयोजन जिल्हा समाजकल्याण कार्यालय बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाने आपल्या हक्काचे मतदान करावे,मतदान आपला अधिकार आहे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये असे आवाहन करण्यात आले.या रॅली मध्ये मुख्याध्यापक श्री.विनायक ठोंबरे सर,मुख्याध्यापिका जाधव मॅडम,मुख्याध्यापिका सुर्यवंशी मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रॅलीत सहभागी झाले…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा अध्यक्ष विजय दादा साळवे यांचा रमेशराव आडसकर यांना पाठिंबा चळवळीतील सच्चा नेता म्हणून विजय दादा साळवे यांची ओळख माजलगाव- माजलगाव येथे पत्रकार परिषदेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा अध्यक्ष विजयदादा साळवे यांनी अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. माजलगाव मतदारसंघात विजय दादा साळवे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची दलित समाजातील नागरिक, तरूण व इतर समाजातील जनतेशी चांगले संबंध असून सच्चा चळवळीतील नेता म्हणून त्यांना जिल्ह्यात ओळखले जाते. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे रमेशराव आडसकर यांना दलित समाजातील मतदानाचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमास मुंबई कृषी बाजार समितीचे मा.…
रमेशराव आडसकर यांना मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा माजलगाव मतदारसंघ का आमदार कैसा हो रमेशराव आडसकर जैसा हो.. घोषणांनी परिसर दणाणून निघाला माजलगाव- अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना आता सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. माजलगाव शहरातील मुस्लिम समाजाने रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे. कुरेशी मोहल्ला येथे मुस्लिम बांधवांनी बैठकीचे नियोजन करून रमेशराव आडसकर, अशोक आबा डक व अनेक मुस्लिम नेते यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. माजलगाव का आमदार कैसा हो रमेशराव आडसकर जैसा हो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठी माय माऊली महीला देखील सरसावल्या या बहिणींची ओवाळणी भावाला विजयी करणार अशी होत आहे चर्चा..! माजलगाव-धारूर-वडवणी- माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर हे शेगडी या चिन्हावर लढत आहेत. यासाठी त्यांनी प्रचारात जोर धरला असून मतदारांच्या प्रत्येक्ष भेटीवर भर दिला आहे. मतदार हाच आपला पक्ष म्हणून ते मतदारसंघात भेटी घेत आहेत. त्यांना मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते, युवा मतदार व आता महीला मतदार देखील रमेशराव आडसकर हेच आमदार पाहीजेत यासाठी त्यांचे भेटी दरम्यान मतदारसंघात औक्षण करून मतदान करून निवडून देण्याचा शब्द देत आहेत. गेल्या पाच वर्षापासून रमेशराव आडसकर यांची माजलगाव…
मनसेचे रमेश गालफाडे यांच्या प्रचाराचा साळेगाव येथून शुभारंभ मतदारसंघात रमेश तात्या गालफाडे यांचे मतदारात आकर्षण केज! प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज केज तालुक्यातील साळेगाव येथून करण्यात आला. हनुमान मंदिर, संत भगवान बाबा मंदिर येथे नारळ फोडून व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, पीर बाबा दर्गा येथे चादर चडवून प्रचाराला सुरवात केली. 20 नोव्हेंबर ला रेल्वे इंजिन ला मतदान करून रमेश तात्या गालफाडे यांना विधासभेत पाठवून इतिहास रचण्याचे आव्हान केज विधानसभा मतदारसंघातील उपस्थित नागरिकांना केले. यावेळी नागरीकांनी त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. केज मतदारसंघात रमेश तात्या…