
मतदानाच्या मशीनवर अनुक्रमांक २८ असलेले रमेशराव आडसकर मतदारांच्या पसंतीस १ नंबरवर
माजलगाव-
विधानसभा मतदार संघात मतदानाच्या मशिनवर २८ अनुक्रमांक असलेले रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) हे सध्या निवडून येण्याच्या दृष्टीने १ नंबरवर पोहचले आहेत. मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणात निर्दोष असताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांची उघडपणे बाजू घेणारे बाबुराव पोटभरे यांनी आडसकरांना पाठींबा दिला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पाठींबा जाहिर केला. बैलगाडा शर्यत संघटनेने आडसकरांनाच पाठींबा दिला आहे. शिवाजीभाऊ सुतार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आडसकरांना पाठींबा दिला आहे. पप्पूभैय्या सोळंके यांच्या पाठींब्यामुळे आणखी पारडे जड झाले आहे. त्यामुळे माजलगाव मतदार संघात या वेळी अपक्ष आमदार म्हणून रमेश आडसकर विजयी होणार हे निश्चित झाले आहे. रमेशराव आडसकर यांना विधानसभा निवडणुकीत अल्पशा मतदानाने पराभव स्वीकारावा लागला होता, गेली पाच वर्ष मतदार संघात वेळोवेळी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या, सर्वांशीजिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केल्यामुळे मतदार संघात सर्वत्रच सहानुभुतीची लाट आहे, गावागावात आडसकर हेच नाव चर्चेत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दिंद्रुड येथे कार्यकर्त्यांनी संपूर्ण दिंद्रुड शहरातील
रमेशराव आडसकरांना मतदारांचे वचन
२८
नंबरचे बटण
शेगडी
घरोघरी जाऊन आडसकरांच्या कामाविषयी व चिन्ह पोचवल्याने रमेशराव आडसकरांची ताकत मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माजलगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून रमेशराव आडसकर हे निवडणुक लढवत असुन, आडसकर यांचा गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. मात्र पराभवाने खचून न जाता आडसकर यांनी पुन्हा नव्या जोमाने मतदार संघात आपला असलेला जनसंपर्क वाढवतच ठेवला. लोकांच्या अडीअडचणीला धावुन जात त्यांना मदत करणे. लोकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहुन, लोकांच्या सुखा दुःखात कायम सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या
शेतीमालास योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा. यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलन करून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. मतदार संघातील आपला जनसंपर्क थोडाही कमी होऊ न देता कामाच्या माध्यमातुन तो वाढवतच ठेवला. त्यामुळे जनतेत आडसकरांबद्दल मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली असुन, या निवडणुकीत इतर कोणत्याही उमेदवारास मतदान न करता कायम आपल्या सोबत राहून आपल्यासाठी संघर्ष करणाऱ्या रमेशराव आडसकर यांनाच मतदान करून, माजलगाव मतदार संघाचे आमदार करण्याचा निर्धार मतदार संघातील सर्वसामान्य मतदार नागरिकांनी केला आहे.
