Author: विजयराज आरकडे

स्व. संतोष देशमुख यांच्या पत्नीला रमेशराव आडसकरांनी दिले नोकरीच नियुक्ती पत्र; विशेष बाब म्हणून शासनाने दिली पद भरतीस मान्यता केज ! प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आडस ता. केज येथील श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित छ्त्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाने विशेष बाब म्हणून त्यांच्या या पद भरतीस मान्यता दिली असून संस्थेचे सचिव रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडा नंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अशी ग्रामस्थांची…

Read More

होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेचा सत्कार   प्रतिनिधी | केज तालुक्यातील होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत व्यवस्थापक राहुल सावंत यांनी भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिचा गुरुवारी (दि.६) सत्कार केला. प्रियंका इंगळे भारताला पहिला खो-खो वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्याबद्दल तिचा ठिकठिकाणी सन्मान केला जात आहे. होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत देखील सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते नेताजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, होळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक राहुल सावंत, होळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद मलदोडे, पाटोदा अंबा शाखेचे व्यवस्थापक प्रीतम…

Read More

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवीने दिली परीक्षा – गौतम बचुटे/केज :- वडिलांच्या हत्ये नंतर मानसिकता नसताना देखील मन घट्ट करून वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आणि वडीला शिवाय पहिल्यांदा परीक्षा केंद्रावर गेल्याची खंत वैभवी देशमुख हिने परीक्षा देवून आल्या नंतर वैभवी देशमुख हिने प्रतिक्रिया व्यक्त केली. बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीच्या पवन चक्की प्रकल्पाच्या खंडणीच्या प्रकरणातून दोन महिन्या पूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने उच्च माध्यमिक बोर्डाची परीक्षेचा पहिला पेपर सोडविला. परीक्षे नंतर तिने आपली प्रतिक्रिया देताना अत्यंत भावनिक होत म्हटले की, माझा पहिलाच पेपर होता. ज्या वेळेस…

Read More

छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस शाळेच्या वतीने खो-खो विश्वचषक विजेता संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिचा भव्य सत्कार संपन्न; अभ्यासासोबत विविध खेळाचे आयोजन करून असे गुणी खेळाडू घडवावे- मा. रमेशराव आडसकर आडस- खो – खो विश्वकप विजेत्या भारतीय संघाच्या कर्णधार कळबंअंबा गावची कन्या कु. प्रियंका इंगळे यांचा श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडस च्या वतीने मोठ्या उत्साहाने स्वागत सत्कार करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी नृत्य व औक्षण करत प्रियंकाचे कार्यक्रम स्थळी स्वागत केले. या समई संस्थेचे सचिव तथा अंबेजोगाई साखर कारखान्याचे चेअरमन मा. रमेशराव आडसकर साहेब यांनी कु . प्रियंका इंगळे यांचे व वडील,आई, आजोबा,आज्जी यांचे कौतुक करत…

Read More

केज-बीड रोडवर केज जवळ टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात : अपघातात दोघे ठार गौतम बचुटे/केज :- फेब्रुवारी रोजी सकाळी केज-बीड रोडवर केज तालुक्यातील सांगवी (सारणी) पुला जवळ कॅन्टर टेम्पो क्र. (टी एस-०१/यु सी-५५०२) आणि बोलेरो क्र (एम एच-१६/ए टी-००६२) गाडीचा अपघात झाला. यात नातेवाईकांच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जात असलेल्या उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले वय (४५ वर्ष) (रा. कोरेगाव ह. मु. शिक्षक कॉलनी केज) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील जखमी असलेले लक्ष्मण डोईफोडे, राम डोईफोडे आणि इतर दोघे यांना अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलविले होते. त्यातील एकाचा देखील मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झालेला…

Read More

काल केज रिलायन्स पेट्रोल पंपा समोर झाला होता अपघात अपघातात पाचजण जखमी गौतम बचुटे/केज :- केज येथे झालेल्या मोटार सायकलच्या अपघातात मोटार सायकल वरील चारजण तर कार जवळ उभा असलेल्या एकजण असे मिळून पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील चौघांचे नावे समजले असून एकाचे नाव समजले नाही. या बाबतची माहिती अशी की, दि. ६ फेब्रुवारी रोजी केज येथील बीएसएनएल च्या टॉवर जवळ असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ दुपारी ३:०० च्या सुमारास आरणगाव ता. केज येथील हरिश्चंद्र संपत सिरसाट वय (३० वर्ष), त्यांची पत्नी सौ. रुपाली हरिशचंद्र सिरसाट वय (२५ वर्ष) त्यांचा मुलगा सार्थक हरिश्चंद्र सिरसाट वय (५ वर्ष) आणि…

Read More

खो-खो विश्वचषक विजेती कर्णधार प्रियंका इंगळेचा जनविकास महाविद्यालयात भव्य सहकुटुंब सत्कार प्रियंकाने भारताचे नाव जगात गाजवले—-डॉ बाबासाहेब गोरे   केज- तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात भारताची पहिली महिला खो-खो विश्वचषक विजेती कर्णधार प्रियंका हनुमंत इंगळे हिच्या दैदीप्यमान यशाबद्दल जनविकास महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, सत्कारमूर्ती प्रियंका इंगळे तसेच प्रियंकाच्या मातोश्री सौ. सविता इंगळे, वडील श्री. हनुमंत इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियंका इंगळे हिचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या हस्ते बुके, शॉल,स्मृतीचिन्ह व रोख 11000/- रुपये देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देत असताना प्रियंका इंगळे हिने खो-खो खेळाविषयीचे…

Read More

कायदा व सुव्यवस्था पुनर्स्थापित करा आणि उजणीचे पाणी बीडला द्या; खा.बजरंग सोनवणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांकडे पत्राद्वारे मागणी; बीड: बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. ती पुनर्स्थापित करण्यात यावी, याच बरोबर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती करण्यासाठी उजनी धरणातून १० टीएमसी पाणी बीड जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून मंजूर करावे, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुंटेफळ (ता.आष्टी) येथील कार्यक्रमात निवेदनाव्दारे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या काही वर्षांत बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अतिराजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस दलाला स्वतंत्रपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करण्यास अडथळे येत आहेत. स्थानिक…

Read More

केज येथे कर्करोग व स्त्री रोग आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांनी घेतला लाभ केज – ४ फ्रेब्रुवारी रोजी हा कँन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने केज शहरातील सामाजिक संस्था कै. अप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्था, उपजिल्हा रुग्णालय, श्रेया हास्पिटल केज यांनी संयुक्त विध्यामाने आयोजित केलेल्या कर्करोग व स्त्री रोग मोफत शिबिराचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डाँ.अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले याशिबिरात शेकडो रुग्णांची आरोग्य तपासणी केली यामध्ये,कर्करोग,स्त्रीरोग,गुडगे दु:खी,अर्थो,तसेच इतर मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले या शिबिरात सात रुग्ण संशयत आढळून आले.तसेच दोन रुग्णांना कँन्सर अढळले आहे. या तज्ञं डॉ.राघवेंद्र राजेश्वरकर, बार्शी/मुंबई डॉ.नंदकुमार पानसे,उपजिल्हा रुग्णालयचे अधिक्षक…

Read More

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो- लक्ष्मणरावजी बेडसकर केज प्रतिनिधी- जीवन विकास शिक्षण मंडळ केज, संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] केज या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षांमधील स्नेहसंमेलन कार्यक्रम अत्यंत हर्षोत्साहत पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. लक्ष्मणरावजी बेडसकर गटशिक्षणाधिकारी, गट साधन केंद्र पंचायत समिती केज तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष, जीवन विकास शिक्षण मंडळ केज हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे संचालक नारायण अण्णा अंधारे, शैलाताई इंगळे अध्यक्षा, शालेय व्यवस्थापन समिती मा. वि. केज, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,…

Read More