Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

स्व. संतोष देशमुख यांच्या पत्नीला रमेशराव आडसकरांनी दिले नोकरीच नियुक्ती पत्र; विशेष बाब म्हणून शासनाने दिली पद भरतीस मान्यता

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 14, 2025No Comments2 Mins Read
स्व. संतोष देशमुख यांच्या पत्नीला रमेशराव आडसकरांनी दिले नोकरीच नियुक्ती पत्र;

 

विशेष बाब म्हणून शासनाने दिली पद भरतीस मान्यता

केज ! प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आडस ता. केज येथील श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित छ्त्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाने विशेष बाब म्हणून त्यांच्या या पद भरतीस मान्यता दिली असून संस्थेचे सचिव रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडा नंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अशी ग्रामस्थांची आणि विविध स्तरातून मागणी केली होती. त्या नुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण संस्थेतील नोकरी बंद असल्याने विशेष बाब म्हणून पद भरतीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना छ्त्रपती.शिक्षण संस्था आडस संचलित श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ विद्यालय आडस येथे लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
त्यांना सुरुवातीचे तीन वर्षे परिविक्षाधीन कालावधीसाठी त्यांना प्रती महिना १० हजार रु. मानधन देण्यात येणार असून त्या नंतर मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव रमेश आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. यावेळी रमेशराव आडसकर, राजेश्वर देशमुख आणि देशमुख यांच्या मातोश्री शारदाताई देशमुख, भाऊ धनंजय देशमुख, माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर, केजचे उपनगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, दिलीप गुळभिले, चिंचोली माळीचे सरपंच सुनील देशमुख, साळेगावचे सरपंच कैलास जाधव, सारणी (आ.) चे सरपंच संतोष सोनवणे, रंजित आडसकर हे उपस्थित होते.

मदितीचा धनादेश :-
या वेळी रमेश आडसकर यांनी देशमुख कुटुंबीयांना नोकरीच्या नियुक्ती पत्रा सोबतच ५ लाख ५५ हजार रु. चा मदतीचा धनादेश देखील सुपूर्त केला.
विजयराज आरकडे

Post Views: 394
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.