केज-बीड रोडवर केज जवळ टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात : अपघातात दोघे ठार
गौतम बचुटे/केज :- फेब्रुवारी रोजी सकाळी केज-बीड रोडवर केज तालुक्यातील सांगवी (सारणी) पुला जवळ कॅन्टर टेम्पो क्र. (टी एस-०१/यु सी-५५०२) आणि बोलेरो क्र (एम एच-१६/ए टी-००६२) गाडीचा अपघात झाला. यात नातेवाईकांच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जात असलेल्या उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले वय (४५ वर्ष) (रा. कोरेगाव ह. मु. शिक्षक कॉलनी केज) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील जखमी असलेले लक्ष्मण डोईफोडे, राम डोईफोडे आणि इतर दोघे यांना अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलविले होते. त्यातील एकाचा देखील मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झालेला असून तिघे जखमी आहेत.