Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

बीडचे खा.बजरंग सोनवणेंची परदेशात क्रेझ; शिवजयंतीनिमीत्त आले अबुधाबीतून निमंत्रण; २३ फेब्रुवारी मोठ्या थाटात शिवजन्मोत्सव होणार साजरा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 21, 2025No Comments2 Mins Read
बीडचे खा.बजरंग सोनवणेंची परदेशात क्रेझ; शिवजयंतीनिमीत्त आले अबुधाबीतून निमंत्रण;
२३ फेब्रुवारी मोठ्या थाटात शिवजन्मोत्सव होणार साजरा 

 

केज-
महाराष्ट्रासह देशभरात आणि आता जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यावर्षी अरब देशातील अबुधाबीमध्ये दि.२३ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून बीडचे खा.बजरंग सोनवणे यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरातील विविध देशात साजरी केली जात आहे. महाराष्ट्र आणि हिंदूस्थानातील नागरिक परदेशात आता शिवजयंती साजरी करू लागले आहे. अरब देशातील अबुधाबी येथे मागील सात वर्षांपासून उमेश नळगे पाटील, प्रदिप आघाव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करत आहेत. यावर्षीही जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना या जयंती उत्सवाचे निमंत्रण दिले जात असते. यावर्षी बीड जिल्ह्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले खा.बजरंग सोनवणे यांना प्रमुख म्हणून निमंत्रीत केले आहे. त्यांच्यसोबत मोलीजीराजे शाहू छत्रपती, मंत्री आयुष स्वतंत्र प्रभार आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार-ना.प्रतापराव जाधव यांनाही निमंत्रीत करण्यात आलेले आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर तातडीने बीड-अहिल्यानगर रेल्वेप्रश्नी लक्ष घातलेले आहे. या शिवाय मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वप्रथम आवाज उठविला होता. अगदी संसदेत सुध्दा त्यांनी हा विषय पोटतिडकीने आणि माणूसकीच्या नात्याने मांडून महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. याच कारणाने महाराष्ट्रासह परदेशातील भारतीय नागरिकांमध्ये खा.बजरंग सोनवणे यांची के्रझ निर्माण झाली आहे. दि.२३ फेब्रुवारी रोजी अबुधाबी येथे होत असलेल्या शिवजयंती कार्यक्रमास ते उपस्थित राहून भारतीय नागरिक आणि शिवप्रेमींशी ते संवाद साधणार आहेत. बीडचे खा.बजरंग सोनवणे हे अबुधाबीला जयंतीनिमीत्त जात असल्याने ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 213
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.