छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीच केजकरांसाठी आनंदाची अनुभूती
केज-
आज संपूर्ण भारतभर छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. केज येथेही मोठ्या उत्साहाने शिव जन्मोत्सव साजरा केला जातो. शहरातील तहसील कार्यालय जवळ मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक पुर्वीपासून स्थापना केली होती मात्र महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी समस्त शिव भक्त करत होते. परंतू काही शासकीय बाबींची अडचण येत होती.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीच महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात उभा राहिला आणि सकाळी शिव भक्तांना पाहावयास मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्रच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवभक्तांनी हा अश्वारूढ पुतळा पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.