Author: विजयराज आरकडे

स्वच्छता ही माझी जबाबदारी समजून कृतीशील व्हावे– -डॉ.हनुमंत सौदागर केज – साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे गांधी तिर्थ स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतचे महत्त्व व स्वच्छता आरोग्या साठी किती आवश्यक आहे विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाचे पुष्प गुंफताना प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी अस्वच्छता ही मानवनिर्मित घाण आहे तूज आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे स्वच्छतेची सुरुवात सर्वप्रथम स्वतहा पासून सुरू करायला पाहीजे भाषणे देऊन चालणार नाही या साठी आपण स्वतः कृती करायला पाहिजे.पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेसच निसर्गातच सर्वांची निर्मिती झाली आहे. मानव,झाडे झुडपे,पशु पक्षी, प्राणी इत्यादीची निर्मिती झाली परंतु मनुष्याच्या गरजा जरा जास्तच…

Read More

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ५० पेक्षा अधिक महिला शिक्षिकांचा सत्कार सोहळा संपन्न बिचारी बनण्यापेक्षा विचारी बना- शैलाताई इंगळे  केज – केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळ तेच संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तुत्वान तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा गुणगौरव सोहळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा. वि. या शाळेच्या प्रांगणामध्ये दि. १२ मार्च २०२५ रोजी अत्यंत हर्षोत्साहत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून श्रीमती. शैलाताई इंगळे अध्यक्षा, शालेय व्यवस्थापन समिती स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा. वि. केज तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती. पूजा शिवाजीराव शिंदे [ वाकळे ] अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होत्या. याप्रसंगी श्रीमती.…

Read More

जिल्हा परिषद शाळेत आता विद्यार्थी गिरवीत आहेत विविध खेळाचे धडे   गौतम बचुटे/ :-  केज तालुक्यातील साळेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी पाठ्य पुस्तकातील धड्या सोबतच आता विविध खेळाचे धडे गिरवू लागले आहेत. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या सुंदर आणि वृक्षाने नटलेल्या शाळेच्या प्रांगणात आता पीएमश्री योजने अंतर्गत विविध खेळाचे धदे विद्यार्थी गिरवित आहेत. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, विस्तार अधिकारी चाटे, केंद्रे आणि केंद्र प्रमुख अंकुशे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि वैक्तीक व सांघिक खेळात विद्यार्थी निपुण व्हावेत; म्हणून परिश्रम घेत आहे.…

Read More

न्यु इंटेल कॉम्प्युटर्स मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा  केज- येथील नामांकित न्यु इंटेल कॉम्प्युटर्स याठिकाणी ८ मार्च रविवारी सकाळी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याविषयी सविस्तर वृत्त असे केज तालुक्यातील सुप्रसिद्ध व संगणक शिक्षणाबरोबरच वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम नियमित राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी व महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून काही यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. व नंतर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर च्या प्राचार्या सौ.शैलाताई इंगळे मॅडम…

Read More

फिरकी गोलंदाज वरून चक्रवर्ती ची अपयशातून यशाची कहाणी प्रेरणादायी-  तो चाळीसपेक्षा जास्त वेळा सिलेक्शनसाठी गेला. एकही ठिकाणी सिलेक्ट झाला नाही. कधी गोलंदाजीत अपयशी ठरल्यावर फलंदाज बनण्याचा विचार केला, तर कधी पराभव स्वीकारून यष्टिरक्षक (विकेटकीपर) होण्याचा निर्णय घेतला. जीवन त्याला काय बनवू इच्छित होतं, हेच समजत नव्हतं. अखेर, एका दिवशी स्वप्नांच्या खेळपट्टीवर बोल्ड झाल्यावर त्याने निश्चय केला की आता कायमस्वरूपी क्रिकेट सोडून अभ्यास करायचा. पाच वर्ष आर्किटेक्चरची पदवी घेतली, त्यानंतर तीन वर्षे नोकरी केली. पण नोकरीतही मन रमले नाही. शेवटी वडिलांना फोन करून म्हणाला, “पप्पा, ही नोकरी माझ्याकडून होत नाही. फक्त एकदा परत प्रयत्न करू द्या. यावेळी अपयशी झालो, तर…

Read More

महिला सक्षमीकरणासाठी येडेश्वरी फांऊडेशन काम करेल: खा.सोनवणे केजमध्ये येडेश्वरी फाऊंडेशनच्या कार्यालयाचे महिला दिनी उद्घाटन, कतृर्त्ववान महिलांचा केला सन्मान केज: शासनाने लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. परंतु त्यातून महिला सक्षम होणार नाहीत. तर महिला सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मीती करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून आपण येडेश्वरी फांऊडेशनच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मीती करून देण्याचे काम करणार आहोत. सुरूवातीला केज आणि आगामी काळात जिल्हाभरात हा प्रयोग करू, असे प्रतिपादन खा.बजरंग सोनवणे यांनी केले. ८ मार्च जागतीक महिला दिनानिमीत्त केजमध्ये येडेश्वरी फांऊडेशन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा खा.बरजंर सोनवणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कतृर्त्ववान महिलांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संजीवनी देशमुख, पंचायत समितीचे…

Read More

तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिला परितक्त्या महिलेला न्याय !  गौतम बचुटे/केज :- तारीख-पे-तारीख होत असल्याने वैतागून एका परित्यक्ता महिलेच्या विधवा आईच्या नावावरील शेत जमीन ही नवऱ्याने सवतीच्या मुलाच्या नावे एका बनावट १० रू. किंमतीचे बाँड वरून बनावट बक्षीस-पत्राच्या आधारे केल्याचा फेर रद्द करून तहसीलदार यांनी तात्काळ करून त्या पीडित महिलेला दिलेला शब्द खरा केला आणि ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना आदेश देताच अवघ्या काही तासात त्या महिलेला न्याय मिळवून दिला. या बद्दल तहसीलदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरपगाव ता. केज येथील दीपा भानासुर देशमुख यांचा विवाह गावातील रवींद्र श्रीहरी भोसले यांच्याशी झाला होता. लग्ना नंतर त्यांना…

Read More

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ते बीड सद्भावना पदयात्रा संतोष देशमुखांच्या समोर ‘शहीद’ शब्द लागावा – हर्षवर्धन सपकाळ गौतम बचुटे/केज :- संतोष देशमुख यांच्या समोर हत्या झाली असा नव्हे तर ‘शहीद’ हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय, तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने सद्भावना पदयात्रा काढण्यात आली असे सांगून भारताच्या डीएनए मध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखील सद्भावना असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. तसेच भाजप हा खोके बोके आणि आक्का यांना जन्म देणारा कारखाना असल्याची सणसणीत टीका त्यांनी भाजपवर केली. संतोष देशमुख…

Read More

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक संघाचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला नांदेड- दि . 8 मार्च 2025 जागतिक महिला दिना निमित्त गोविंदेश्वर प्रा. शाळा तरोडा बु नांदेड. येथे माता पालक महिलांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला. राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवाद करण्यात आले.निपूण भारत अभियाना अंतर्गत निपूण प्रतिज्ञा घेण्यात आली इयत्ता पाहिली ते सातवीच्या च्या सर्व विद्यार्थ्याच्या मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला शिक्षिका सौ. संध्या सिंदगीकर होते. त्याच बरोबर माता पालक संघांचे सर्व महिला पदाधिकारी सौ. सविता लिंगायत सीमा गायकवाड सुरेखा इंगोले सविता आंबटवार रमावती बघेल अनुसया मोरे जनाबाई…

Read More

TOT    शिक्षक प्रशिक्षणाच्या चौथ्या टप्प्याचा समारोप केज : प्रातिनिधी आज दिनांक ७ मार्च रोजी केज तालुक्यातील भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित TOTअर्थात शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 च्या चौथ्या टप्प्याचा समारोप झाला . सदरील प्रशिक्षण हे ३ मार्च ते ७ मार्च पर्यंत चालले. या प्रशिक्षणात इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील ३०० पेक्षा जास्त शिक्षक, शिक्षिका यांनी सहभाग नोंदवला होता. पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात…

Read More