जिल्हा परिषद शाळेत आता विद्यार्थी गिरवीत आहेत विविध खेळाचे धडे
गौतम बचुटे/ :- 
केज तालुक्यातील साळेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी पाठ्य पुस्तकातील धड्या सोबतच आता विविध खेळाचे धडे गिरवू लागले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या सुंदर आणि वृक्षाने नटलेल्या शाळेच्या प्रांगणात आता पीएमश्री योजने अंतर्गत विविध खेळाचे धदे विद्यार्थी गिरवित आहेत. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, विस्तार अधिकारी चाटे, केंद्रे आणि केंद्र प्रमुख अंकुशे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि वैक्तीक व सांघिक खेळात विद्यार्थी निपुण व्हावेत; म्हणून परिश्रम घेत आहे.
तसेच कुंग-फु, कराटे आणि तायक्वांदो यासारखे आत्मसंरक्षणाचे क्रीडा प्रकारचे विद्यार्थ्यानं ज्ञान आत्मसात करता यावे, म्हणून क्रीडा शिक्षक बन्सी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. त्यासाठी निंगुळे सर, मोरे मॅडम, वाघमारे सर हे परिश्रम घेत आहेत.
