Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

चष्म्याचे दुकान फोडून नगदी १५ हजार रू. सह ३० हजाराचा मुद्देमालाची चोरी : चोरी करणारा सीसीटिव्ही कैद

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 22, 2025No Comments2 Mins Read
चष्म्याचे दुकान फोडून नगदी १५ हजार रू. सह ३० हजाराचा मुद्देमालाची चोरी :
चोरी करणारा सीसीटिव्ही कैद

गौतम बचुटे :-

कळंब येथे आठवडी बाजार परिसरात असलेले चष्म्याच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेले रोख १५ हजार रु. आणि चष्मे असा एकूण ३० हजार रु किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबविले आहेत. शटर उचकटून आत चोरी करताना चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील विष्णू लांडगे व सचिन मस्के या दोघांचे भागीदारीमध्ये कळंब जि धाराशिव येथील आठवडी बाजारात चष्म्याचे दुकान आहे. दि. २१ मार्च रोजी त्यांनी सायंकाळी ७:३० वा. चे सुमारास नेहमी प्रमाणे दुकान बंद करून केज येथे घरी गेले. त्या नंतर दररोजच्या प्रमाणे ते दि. २२ मार्च रोजी सकाळी १०:०० च्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे एक शटर सुमारे अर्धा फूट वर उचकटलेले दिसले. म्हणून त्यांनी दुकान उघडू पाहिले असता दिवसभर झालेल्या धांद्याचें पैसे त्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले नगदी १५ हजार रु. आणि चष्म्याच्या फ्रेम व साहित्य चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान चोरी करताना चोरटा सीसीटिव्हीत कैद झाला असून त्याने अंगात राखाडी रंगाची हुडी, काळी पँट आणि डोळ्यावर चष्मा घातलेले असून तो त्याच्या जवळील टॉर्चच्या प्रकाशात दुकानातील ड्रॉवर आणि सामना शोधीत असताना दिसून येत आहे.
या प्रकरणी विष्णू लांडगे यांनी कळंब पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ११२/२०२५ भा. न्या. सं. ३०५, ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस निरीक्षक रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे हे तपास करीत आहेत.
विजयराज आरकडे

Post Views: 174
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.