Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ५० पेक्षा अधिक महिला शिक्षिकांचा सत्कार सोहळा संपन्न बिचारी बनण्यापेक्षा विचारी बना- शैलाताई इंगळे

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 13, 2025No Comments2 Mins Read
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ५० पेक्षा अधिक महिला शिक्षिकांचा सत्कार सोहळा संपन्न
बिचारी बनण्यापेक्षा विचारी बना-
शैलाताई इंगळे 
केज –
केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळ तेच संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तुत्वान तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा गुणगौरव सोहळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा. वि. या शाळेच्या प्रांगणामध्ये दि. १२ मार्च २०२५ रोजी अत्यंत हर्षोत्साहत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून श्रीमती. शैलाताई इंगळे अध्यक्षा, शालेय व्यवस्थापन समिती स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा. वि. केज तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती. पूजा शिवाजीराव शिंदे [ वाकळे ] अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होत्या. याप्रसंगी श्रीमती. जयश्री अमृतराव कोकीळ, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भाटुंबा, श्रीमती. प्रतिभा डिगांबर करपे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर, तसेच यशस्वी महिलांमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झालेल्या श्रीमती. पूजा शिवाजीराव शिंदे [ वाकळे ] या सत्कारमूर्तींचा मानाचा फेटा बांधून, संस्थेचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवनंदा मुळे यांनी दिला.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( माध्यमिक विभाग ) स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( प्राथमिक विभाग ) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केज, तसेच स्वामी विवेकानंद बालक मंदिर केज, या सर्व शाळेतील जवळपास ५० पेक्षा अधिक महिला शिक्षिका व शिक्षकेतर भगिनींचा सत्कार सोहळा अत्यंत हर्षोत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी सत्कारमूर्ती भगिनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना श्रीमती. पूजा शिंदे म्हणाल्या, लहान वर्गापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे, जेणेकरून स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत होईल तसेच भविष्यातील विविध आव्हानांना सहजपणे सामोरे जाता येईल.

अध्यक्षीय समारोपात श्रीमती. शैलाताई इंगळे यांनी जागतिक महिला दिन का साजरा करावा याची पार्श्वभूमी सांगताना म्हणाल्या, हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागे हा हेतू आहे पुरुष व स्त्रिया हे दोन्ही रथाचे चाके आहेत तेंव्हा पुरुषांनी महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे. यातून तिचा प्रचंड आत्मविश्वास वाढतो तसेच पुरुषांनी तिच्या कठीण प्रसंगी ढाल बनवून तिच्यासोबत राहिले पाहिजे . शेवटी त्या म्हणाल्या, ‘बिचारी बनवण्यापेक्षा विचारी बना’ असे सत्कार समारंभ केवळ शिक्षिका महिलांसाठीच नव्हे, तर ज्या महिला सकारात्मक प्रयत्न करतात आणि इतरांसाठी आदर्श निर्माण करतात त्यांचा सत्कार या व्यासपीठावर केला जाईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. संदीप शेंडगे यांनी केले. तर आभार सहशिक्षिका श्रीमती. अपर्णा देशपांडे यांनी मानले.
विजयराज आरकडे

Post Views: 104
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.