केज दि २०(प्रतिनिधी)
केज येथील तहसील कार्यालयाकडून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी चिमण्यांना पिण्यासाठी पाणी भांडे व्यवस्था करून चिमणी दिवस साजरा केला.
उन्हाळ्यात चिमण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. चिमण्यांना वाचवण्यासाठी तहसील परिसरात असलेल्या झाडांना प्लास्टिकचे भांडे बांधून त्यामध्ये पाणी ठेवण्यात आले
यामुळे झाडावरच्या चिमण्यांना पाणी उपलब्ध झाले आहे हा उपक्रम सर्व नागरिकांनी हाती घेऊन आपापल्या परिसरात चिमण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. पक्ष्यांना वाचवण्यासाठी कृतिशील उपक्रम राबवावेत असे आवाहन भंडारे यांनी केले