न्यु इंटेल कॉम्प्युटर्स मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
केज-
येथील नामांकित न्यु इंटेल कॉम्प्युटर्स याठिकाणी ८ मार्च रविवारी सकाळी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याविषयी सविस्तर वृत्त असे केज तालुक्यातील सुप्रसिद्ध व संगणक शिक्षणाबरोबरच वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम नियमित राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी व महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून काही यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. व नंतर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर च्या प्राचार्या सौ.शैलाताई इंगळे मॅडम यांचा सेंटर च्या वतीने संचालक सौ विजया सत्वधर यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना प्राचार्या सौ. शैलाताई इंगळे यांनी मुलींनी भरपुर शिकले पाहिजे तसेच व स्व संरक्षणासाठी व विकृत मनोवृत्ती ना धडा शिकविण्यासाठी कराटे प्रशिक्षण घेतले पाहिजे व प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादित केले पाहिजे असा सल्ला दिला.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारथी 2024 बॅच ची विद्यार्थिनी अपेक्षा अशोक कापरे हिने केले तर आभार प्रदर्शन सौ विजया सत्वधर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.